Oneplus लॉन्च करणार कंपनीचा पहिला Speaker; काय फीचर्स मिळणार?   

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन ब्रँड म्हणून ओळखला जाणारा OnePlus ब्रँडचे बरेच स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येतात. आता OnePlus कंपनी  मार्केटमध्ये नवीन स्पीकर लॉन्च करणार आहे. हा नवीन लॉन्च करण्यात येणारा स्पीकर हा कंपनीचा पहिला स्पीकर असेल. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला ऑडिओ प्रॉडक्ट मध्ये नॉर्ड बड्स 2 R आणि नॉर्ड बड्स 2 हे इयर बड्स कंपनी लॉन्च केले होते. आता कंपनी नॉर्ड बर्ड्स 3 लॉन्च करणार आहे. यासोबतच कंपनी स्पीकर देखील लाँच करेल. या नवीन लॉन्च करण्यात येणाऱ्या स्पीकर बद्दल कंपनीने माहिती दिली आहे. 

   

Oneplus Speaker

OnePlus कंपनीने इंस्टाग्राम पोस्ट करत नवीन स्पीकरच्या लॉन्चिंग बद्दल माहिती दिली. कंपनीचा हा पहिला स्पीकर असल्याचे वक्तव्य केले जात आहे. इंस्टाग्रामवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्युझिक साठी तयार व्हा… असे कॅप्शन देण्यात आले आहे. या टीझरमध्ये स्पीकरची डिझाईन आणि इंटरनल हार्डवेअर आपण पाहू शकतो. या स्पीकर चे वुफर वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये फोकस करण्यात येऊ शकतात.  त्यानुसार हा स्पीकर 360 डिग्री ऑडिओ एक्सपिरीयन्स ऑफर करण्याची शक्यता आहे. याबाबत कंपनीने अजून कोणतीच माहिती उपलब्ध केली नसून लवकरच हा स्पीकर लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Oneplus Nord Buds 3

Oneplus कंपनीने मार्केटमध्ये  NORD BUDS 2R आणि NORD BUDS 2 हे ऑगस्ट महिन्यात लॉन्च केले होते. त्यानुसार या इयर बड्सची किंमत अनुक्रमे 2199 आणि 2999 रुपये होती. कंपनीने हे इयर बड्स डीप ग्रे आणि ट्रिपल ब्ल्यू कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केले होते. आता कंपनी BUDS 3 वर काम करत असून हे इयर बड्स मेटॉलिक फिनिशिंग सह लॉन्च करण्यात येऊ शकतात. या नवीन अपकमिंग इयर बड्स मध्ये 48DB ऍक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन, ब्लूटूथ, गुगल फास्ट पेयर आणि ड्युअल कनेक्शन सपोर्ट उपलब्ध असेल.