Internet नसलं तरी Online Payment करता येतंय; फक्त ‘या’ Tricks वापरा

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यावर भर दिला जातो. गूगल पे, फोन पे यांसारख्या अँप च्या माध्यमातून अगदी 1 मिनिटात पैसे पाठवता येतात. त्यामुळे खिशात पैसे नसले तरी ग्राहकांची कोणतीही कामे थांबत नाहीत. कोरोना काळापासून तर ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट असणे गरजेचे असते. पण तुम्हाला माहिती आहे का? जर तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट नसलं तरीही ऑनलाईन पेमेंट करणं शक्य आहे. यासाठी तुम्ही कोणकोणते मार्ग अवलंबू शकता हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

   

1) USSD सेवा-

USSD सेवा ही बँकेकडून देण्यात येणारी सेवा आहे. या पेमेंट पद्धतीचा वापर करून इंटरनेट शिवाय तुम्ही पेमेंट करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या डायल पॅड वर *99# हा नंबर डायल करावा लागेल किंवा बँकेने प्रदान केलेली USSD सेवा वापरून आवश्यकतेनुसार पैसे पाठवू शकता. *99# सह, बँकिंग सेवा देशभरातील प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, कारण ती देशातील मोठ्या 83 बँका आणि 4 दूरसंचार सेवा प्रदात्यांनी ऑफर केली आहे.

2) मोबाईल वॉलेट-

फोन पे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या बँकिंग अँप वर वॉलेट पद्धत उपलब्ध आहे. यामुळे इंटरनेट बंद असताना देखील आपण पेमेंट करू शकतो. परंतु त्यासाठी या वॉलेटमध्ये अगोदरच पैसे टाकावे लागतात.

3) UPI वन टू थ्री पे सुविधा-

जर तुमच्याकडे इंटरनेट सेवा उपलब्ध नसेल तर तुम्हाला कीपॅड फोनवर जाऊन कॅशलेस पैसे मिळू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला या फिचर फोनचा वापर करावा लागेल. वरील तिन्ही पद्धती वापरून इंटरनेट शिवाय ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणे अगदी सोपे आहे. यामुळे मोबाईल मध्ये इंटरनेट नसलं तरी दुसऱ्यांना पैसे पाठवता येऊ शकतात.