मंगळावर जाण्याची इच्छा आहे? फक्त 22 लोक जाऊ शकतात; जाणून घ्या काय आहेत अटी

टाइम्स मराठी । नुकतंच 23 ऑगस्टला भारताचे Chandrayaan 3 मिशन यशस्वी झाले. यावेळी भारताच्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. आणि संपूर्ण जगात भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. यातच आता बाकीच्या ग्रहावर देखील अंतराळ यान पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे. यानुसार अमेरिकन कंपनीने मागच्या वर्षी मंगळावर जाण्यासाठी इच्छित असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागवले होते. तुम्ही देखील मंगळ ग्रहावर (Mars Planet) जाण्याचे स्वप्न पाहत असाल. यासोबतच तुमच्या डोक्यात मंगळ ग्रहावर जाण्यासाठी वेगवेगळे प्रश्न आले असतील. परंतु खरंच आपण मंगळावर जाऊ शकतो का? मंगळावर जाण्यासाठी ट्रेनिंगची गरज आहे का अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

   

जॉर्ज मिशन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एका रिसर्च च्या माध्यमातून मंगळावर जाणारे लोक कोणते असतील हे सांगितलं. मंगळावरचे वातावरण असह्य असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला मंगळावर राहण्यासाठी जायचं असेल तर बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागेल. सर्वच व्यक्ती मंगळावर राहू शकत नाही. यामुळे मंगळावर मानवी वस्ती उभारणे हे अत्यंत अवघड काम आहे. असं या शास्त्रज्ञांनी रिसर्चच्या माध्यमातून सांगितलं.

22 लोक मंगळावर जाऊ शकतात

शास्त्रज्ञांच्या मते, सुरुवातीला मंगळ ग्रहावर फक्त 22 लोक जाऊ शकतात. परंतु हे 22 लोक इंजिनीयर आणि टेक्नॉलॉजी वर प्रभुत्व मिळवणारे असतील. यासोबतच क्लोस्टोफोबिक नसावेत म्हणजे त्यांना अचानक झालेल्या बदलांची भीती वाटू नये. याशिवाय पाणबुडी मध्ये प्रवास करण्याचा अनुभव त्यांना यापूर्वी असावा. आणि युद्ध परिस्थितीमध्ये ते घाबरून न जाता ते त्या ठिकाणी राहण्यासाठी सक्षम हवेत.

arXiv प्रीप्रिंट सर्वरवर पब्लिश रिपोर्टनुसार, जे व्यक्ती देण्यात आलेल्या सर्व अटींचे पालन करू शकतील तेच मंगळावर जाऊ शकतात. थोडक्यात मंगळावर जाणारी व्यक्ती इंजिनीयर आणि अंतराळवीर असणे गरजेचे आहे. यासोबतच स्पेस एक्सचे बॉस एलन मस्क हे अंतराळवीर म्हणून जाणारे पहिले यात्री असू शकतात. 28 ऑगस्टला प्रसारित होणाऱ्या स्टार्स ऑन मार्स या शोच्या काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष लावला आहे.