Open AI ने लॉन्च केले ChatGPT चे कस्टम व्हर्जन; जुन्या मॉडेल पेक्षा सक्षम आणि स्वस्त

टाइम्स मराठी । सॅम ऑल्डमॅन संचालित Open AI चॅटबॉट ChatGPT चे कस्टम व्हर्जन लॉन्च करण्याबाबत घोषणा केली आहे. AI CHATBOT CHATGPT 100 मिलियन मासिक ऍक्टिव्ह युजर्स पर्यंत पोहोचले आहे. लॉन्च केल्यानंतर दोन महिन्यानंतर ही सर्विस 100 मिलियन मासिक युजर्स पर्यंत पोहोचली आहे. 20 लाख पेक्षा जास्त डेव्हलपर्स हे प्लॅटफॉर्म वापरत असून यामध्ये 92 टक्के पेक्षा जास्त फॉर्च्यून 500 कंपन्यांचा समावेश आहे.  आता  Open AI ने नवीन GPT 4 टर्बो मॉडेल लॉन्च केले आहे. हे मॉडेल अधिक सक्षम आणि स्वस्त आहे.

   

Open AI ने लॉन्च केलेले नवीन GPT 4 टर्बो मॉडेल 128,000 कॉन्टेक्स्ट विंडोला सपोर्ट करते. त्यामुळे हे एकाच प्रॉम्प्ट मध्ये 300 पेक्षा जास्त पेजवरील मजकुरामध्ये फिट होऊ शकतात. या GPT 4 टर्बो मॉडेल सोबतच कंपनीने GPT 3.5 टर्बोचे एक नवीन व्हर्जन देखील जारी केले आहे. हे वर्जन डिफॉल्ट 16,000 कॉन्टेक्स्ट विंडोला सपोर्ट करते. याशिवाय कंपनीकडून DALL डॉट इ 3 ला देखील इंटिग्रेटेड करण्यात येणार आहे. हे ChatGPT प्लस आणि एंटरप्राइज युजर साठी लॉन्च करण्यात आले होते.

सोमवारी रात्री कंपनीच्या पहिल्या डेव्हलपर कॉन्फरन्सला संबोधित करत त्यांनी सांगितलं की, जवळपास एक वर्षापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या सर्विस ने  फक्त 2 महिन्यांमध्ये 100 मिलियन मासिक युजर्स  मिळवले आहेत. त्याचबरोबर ते म्हणाले की २० लाख पेक्षा जास्त डेव्हलपर्स या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. यामध्ये 92% पेक्षा जास्त फॉर्च्यून 500 कंपन्यांचा सहभाग आहे. GPT 4 टर्बो मॉडेल लॉन्चिंग बाबत कंपनीने सांगितलं की, आम्ही या वर्षांच्या परफॉर्मन्स ला ऑप्टिमाइज केले आहे. जेणेकरून टर्बो GPT 4 ला इनपुट टोकन साठी तीन पटीपेक्षा  स्वस्त किमतीत आणि आउटपुट टोकन साठी दोन पटीपेक्षा कमी किमतीत  लॉन्च करू शकतो.

एक असिस्टंट च्या उद्देशाने डेव्हलप करण्यात आलेल्या AI मध्ये विशिष्ट निर्देश आहेत. जेणेकरून अतिरिक्त ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी मॉडेल्स आणि टूल्स ला कॉल करू शकतील. या सोबतच नवीन असिस्टंट हे API CODE इंटरप्रिटर आणि रिट्रीवल सोबतच  फंक्शन कॉलिंग यासारख्या नवीन क्षमता प्रदान करते.

Open AI हे एक टेक्स्ट टू स्पीच API लॉन्च करत आहे. हे सिलेक्ट करण्यासाठी  6 प्रिसेट व्हॉइस 2 जनरेटिव्ह एआय मॉडेल व्हेरिएंट प्रदान करण्यात येणार आहे. त्यानुसार आता डेव्हलपर्स टेक्स्ट टू स्पीच API च्या  माध्यमातून टेक्स्ट ह्यूमन कॉलिटी स्पीच जनरेट करू शकतात. या API साठी किंमत 1000 शब्दांसाठी  0.015 डॉलर एवढी असेल.