टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने आपल्या A सिरीजचा विस्तार करत Oppo A18 हा मोबाईल भारतीय बाजारात लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनी ने हाच मोबाईल UAE मध्ये लॉन्च केला होता. Oppo A18 हा सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा 9999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला असून या मोबाईल मध्ये तब्बल 8GB रॅम देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्स आणि ड्रॉ ऑफर देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आज आपण या मोबाईलमधील खास फीचर्स बाबत जाणून घेऊयात.
6.56 इंच डिस्प्ले –
Oppo A18 या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच फुल HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1612 पिक्सेल रिझोल्युशन आणि 90 HZ रिफ्रेश रेट सह येतो. तसेच हा डिस्प्ले 720 निट्स पीक ब्राईटनेस, 100 टक्के DCI P3 आणि 100 टक्के SRGB कलरला देखील सपोर्ट करतो. या मोबाईलवर वॉटर ड्रॉप नॉच आणि एकूण 89% स्किन टू बॉडी रेशो देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये जास्त काळ टिकणारी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33 V सुपरवुक चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा – Oppo A18
मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, Oppo A18 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासोबतच रियल कॅमेरा पिल शेप मध्ये उपलब्ध आहे. या मोबाईल मधील प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल एवढा असून ऑटो फोटो सपोर्टसह उपलब्ध आहे. सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल एवढा असून समोरील बाजूला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo A18 मध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच, 4GB एक्सटेंडे रॅम सपोर्टच्या मदतीने, 8GB पर्यंत रॅम उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ग्लोइंग ब्लू आणि ग्लोइंग ब्लॅक या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.
कनेक्टिव्हिटी
Oppo A18 या स्मार्टफोनमध्ये 2D डिझाईन देण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे वजन 188 ग्राम एवढे आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंट साईडने वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आला आहे. Oppo A18 या स्मार्टफोन मध्ये USB टाईप पोर्ट, 3.5 एमएम हेडफोन जॅक, 4G, वाय फाय, जीपीएस, साईड फेसिंग फिंगरप्रिंट सेंसर यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड असून ColorOS 13.1 वर काम करतो.
ऑफर काय आहे?
OPPO A18 या स्मार्टफोनची किंमत फक्त 9,999 रुपये एवढी आहे. या स्मार्टफोनवर कंपनीकडून SBI , वन कार्ड, IDFC , बँक ऑफ बडोदा यासारख्या बँकेच्या कार्डवर खरेदी केल्यास डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही जर या बँकेच्या कार्ड वरून स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर कंपनीकडून करण्यात येत आहे. एवढेच नाही तर लकी ड्रॉ ऑप्शन देखील कंपनीने ठेवले आहेत. या लकी ड्रॉ ऑप्शनमध्ये OPPO A18 हा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ विजेत्याला OPPO ENCO BUDS 2 मिळणार आहेत.