OPPO A18 दमदार फीचर्स सह लाँच; 50 MP कॅमेरा अन् 5000mAh बॅटरी

टाइम्स मराठी | Oppo ओपो कंपनीने नुकताच नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन UAE मध्ये लॉन्च करण्यात आला असून ओप्पो च्या A सिरीज मध्ये हा स्मार्टफोन ऍड करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे नाव OPPO A18 असे असून कंपनीने अजून या मोबाइल ग्लोइंग ब्लू आणि ग्लोइंग ब्लॅक या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.

   

6.56 इंच डिस्प्ले

Oppo A18 या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच फुल HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1612 पिक्सेल रिझोल्युशन आणि 90 HZ रिफ्रेश रेट सह येत आहे. तसेच. हा डिस्प्ले 720 निट्स पीक ब्राईटनेस, 100 टक्के DCI P3 आणि 100 टक्के SRGB कलर ला देखील सपोर्ट करतो. या स्मार्टफोनवर वॉटर ड्रॉप नॉच आणि एकूण 89% स्किन टू बॉडी रेशो देण्यात आला आहे.हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड असून ColorOS 13.1 वर काम करतो.

कॅमेरा – OPPO A18

मोबाइल च्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, Oppo A18 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासोबतच रियल कॅमेरा पिल शेप मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल एवढा असूनब सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल एवढा आहे. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Oppo A18 हा मोबाईल 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33 V सुपरवुक चार्जिंगला सपोर्ट करते. Oppo A18 या स्मार्टफोन मध्ये यूएसबी टाईप पोर्ट, 3.5 एमएम हेडफोन जॅक, 4G, वाय फाय, जीपीएस, साईड फेसिंग फिंगरप्रिंट सेंसर यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे.