12GB RAM सह Oppo ने लाँच केले 2 नवे मोबाईल; किंमत किती पहा

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने Oppo A1s आणि Oppo A1i नावाचे २ नवे मोबाईल बाजारात लाँच केले आहेत. 12GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह सुसज्ज असणारे हे दोन्ही मोबाईल ग्राहकांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील. सध्या कंपनीने या दोन्ही मोबाईलचे लौंचिंग चीनमध्ये केलं असलं तरी लवकरच हे स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होऊ शकतात. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात…..

   

Oppo A1s चे फीचर्स –

Oppo A1s मध्ये कंपनीने 90Hz रिफ्रेश रेटसह 6.72 इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले दिला आहे. मोबाईलमध्ये MediaTek Dimensity 6002 5G प्रोसेसर बसवला आहे. हा स्मार्टफोन 12GB+256GB आणि 12GB+512GB स्टोरेज व्हेरियेण्ट मध्ये लाँच करण्यात आलाय. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आणि समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास Oppo A1s च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 1,199 युआन ($165) आणि 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 1,399 युआन (~$190) आहे. हा मोबाईल नाइट सी ब्लॅक, डस्क माउंटन पर्पल आणि हिरवा या तीन रंगांत उपलब्ध आहे.

Oppo A1i चे फीचर्स –

Oppo A1i मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सह 6.56 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आहे. मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर बसवण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 8GB + 256GB आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलाय. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईलला 5,000mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. Oppo A1i च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 1,099 युआन (अंदाजे 12,524 रुपये) आणि 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 1,199 युआन (अंदाजे 13,777 रुपये) आहे. हा स्मार्टफोन नाईट ब्लॅक आणि फँटम पर्पल अशा शेडमध्ये खरेदी करता येईल.