Oppo A2 5G : Oppo ने आणला 512 GB स्टोरेजवाला Mobile; किंमत अगदी स्वस्त

टाइम्स मराठी । Oppo कंपनीचे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. कंपनी सुद्धा सातत्याने अपडेटेड फीचर्स सह नवनवीन मोबाईल लाँच करत असते. आता सुद्धा Oppo ने आपल्या A सिरीज अंतर्गत एक नवा मोबाईल बाजारात आणला आहे. Oppo A2 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला तब्बल 512 GB पर्यंत स्टोरेज मिळत आहे. तसेच याची किमत सुद्धा फीचर्सच्या मानाने कमीच आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया Oppo A2 5G चे खास फीचर्स ….

   

स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनल सह 6.72 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल HD + रिझोल्युशन, 90 hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याचबरोबर या मोबाईलमध्ये देण्यात आलेला डिस्प्ले 680 नीट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6020 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन colorOS 13.1 वर काम करतो.

कॅमेरा- Oppo A2 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50 MP , डेप्थ सेंसर 2 MP, आणि समोरील बाजूला 8 MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीने हा मोबाईल 12 GB रॅम आणि 256 GB  इंटरनल स्टोरेज आणि 12GB रॅम आणि 512 GB स्टोरेज या 2 स्टोरेज वेरीएंट मध्ये लाँच केला आहे.

फिचर्स

OPPO A2 5G या स्मार्टफोनमध्ये  साईड माउंटेन फिंगरप्रिंट सेंसर, 5G सपोर्ट, स्टीरियो स्पीकर, जीपीएस, वाय-फाय, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक, USB C PORT यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 5000 MAH बॅटरी सह उपलब्ध असून  ही बॅटरी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते.

किंमत किती?

Oppo A2 5G कंपनीने ग्रीन, ब्लॅक, बेंगनी कलरमध्ये बाजारात आणला आहे. मोबाईलच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, 12GB रॅम आणि 256 GB  इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत CNY 1699 म्हणजेच भारतीय चलनानुसार 19,700 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 512 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत  CNY 1799 म्हणजेच 20,500 रुपये आहे.