OPPO A2 Pro 5G ची लॉन्च डेट आली समोर; ‘हे’ असतील खास फिचर्स

TIMES MARATHI | Oppo कंपनीचा नवीन स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये केव्हा लॉन्च होईल हे अजूनही समजले नाही. परंतु चिनी मार्केटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनचे नाव OPPO A2 Pro 5G असं आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगबाबत माहिती लीक झाली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबरला हा स्मार्टफोन चिनी मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकतो.

   

फिचर्स

OPPO A2 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2412 पिक्सल रिझोल्युशन आणि 120 Hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्शन 7050 SOC चीप सेट देण्यात आली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन Octacore वर बेस्ड असून Android 13, ColorOS 13.1 वर काम करतो.

कॅमेरा आणि स्टोरेज

OPPO A2 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर, यात प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल , फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल मध्ये उपलब्ध असून यामध्ये एलईडी फ्लॅश HDR, ponorama यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर, यात तीन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. त्यापैकी 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज, 12जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे.

किमत

OPPO A2 Pro 5G यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. त्याचबरोबर accelerometer, gyro , ptoximity, हे कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. विबो च्या टीपस्टर डिजिटल चॅट स्टेशन यांनी सांगितलं की, कंपनीकडून लवकरच बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्राम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये फ्री बॅटरी रिप्लेसमेंट प्रदान करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनच्या किमतींचा अजूनही खुलासा करण्यात आला नाही.