Oppo A2m : Oppo ने लाँच केला नवा Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने चिनी मार्केट मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo A2m असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने हा मोबाईल मीड रेंज सेगमेंट मध्ये आणला आहे. चीनमध्ये या मोबाईलची विक्री सुद्धा सुरु करण्यात आली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला असून तुम्हाला यामध्ये बेस्ट इन क्लास फीचर्स मिळतील. लवकरच हा मोबाईल भारतात सुद्धा लाँच होऊ शकतो. आज आपण Oppo A2m चे खास फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

Oppo A2m या स्मार्टफोन मध्ये 6.56 इंच चा LCD पॅनल, HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 × 1612 पिक्सल रिझोल्युशन आणि 90 HZ रिफ्रेश रेटसह येतो . त्याचबरोबर हा डिस्प्ले 720 नीट्स पीक ब्राईटनेससह सुसज्ज आहे. या मोबाईल मध्ये कंपनीने मीडियाटेक डायमेंसिटी 6020 चिपसेट बसवली असून हा स्मार्टफोन  android 13 वर बेस्ड ColorOS 13.1 वर चालतो.

कॅमेरा– Oppo A2m

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Oppo A2m या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 13 MP चा प्रायमरी मिळत असून समोरील बाजूला 5 MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये तीन स्टोरेज व्हेरिएंट देण्यात आले आहे. त्यानुसार 6 GB रॅम +128 GB स्टोरेज, 8 GB रॅम + 256 GB स्टोरेज आणि 12 GB रॅम  + 256 GB स्टोरेज तुम्हाला यामध्ये मिळेल

कनेक्टिव्हिटी आणि किंमत

Oppo A2m या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर, 5000 mAh बॅटरी यामध्ये उपलब्ध आहे. ही बॅटरी 10 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी साठी या मोबाईल मध्ये ड्युअल सिम,  5G,  ड्युअल बँड WIFI , ब्लूटूथ, हेडफोन यासारखे ऑप्शन उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनच्या किमतींबद्दल बोलायचं झालं तर, 1499 युवान म्हणजेच 17,200 रुपयांमध्ये हा मोबाईल उपलब्ध आहे. तुम्ही हा मोबाईल स्टारी नाईट ब्लॅक आणि फ्लाईंग फ्रॉस्ट पर्पल या दोन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता.