Oppo लवकरच लाँच करणार 2 दमदार Mobile; काय फीचर्स मिळणार?

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo आपले Oppo A2x आणि Oppo A2m हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबाबत ऑफिशियल माहिती उपलब्ध नसून Teena या वेबसाईटवर PJU110 या मॉडेल नंबर ने हे दोन स्मार्टफोन स्पॉट करण्यात आले आहे. यावेळी या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन समोर आले आहेत.

   

6.56 इंचचा डिस्प्ले –

OPPO A2x आणि Oppo A2m या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 6.56 इंच चा LCD पॅनल HD+ रिझोल्युशन डिस्प्ले उपलब्ध होऊ शकतो. हा डिस्प्ले 720 × 1612 पिक्सल रिझोल्युशन देईल. या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 2.2 Ghz प्रोसेसर मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. OPPO A2x आणि Oppo A2m दोन्ही स्मार्टफोन android 13 वर बेस्ड कलर OS13 वर काम करू शकतात.

कॅमेरा –

OPPO A2x आणि Oppo A2m या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप कंपनीकडून उपलब्ध करण्यात येऊ शकतो. यामध्ये प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सेल विथ LED फ्लॅश आणि समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. हे स्मार्टफोन 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज आणि 12 GB रॅम + 256 GB स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये उपलब्ध होऊ शकतात. यासोबतच लिस्टिंग मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.

OPPO A2x आणि Oppo A2m या दोन्ही स्मार्टफोनबद्दल वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन लवकरच चीनमध्ये लॉन्च होऊ शकतो. या दोन्ही स्मार्टफोनच्या किमती बद्दल काही माहिती मिळालेली नाही. मात्र लवकरच याबाबत अधिक तपशील उघड होईल.