OPPO A2x : Oppo ने लाँच केला नवा मोबाईल; 8 GB रॅम, किंमतही कमी

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने चिनी बाजारात आपला नवीन स्मार्टफोन OPPO A2x लाँच केला आहे. जबरदस्त फीचर्स आणि दमदार स्टोरेजने सुसज्ज असलेला हा मोबाईल कंपनीने अगदी परवडणाऱ्या किमतीत लाँच केला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

   

स्पेसिफिकेशन

OPPO A2x या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच चा HD + डिस्प्ले देण्यात आला आहे . हा डिस्प्ले 720 × 1612  पिक्सल रिझोल्युशनआणि 90 hz रिफ्रेश रेटसह येतो. या मोबाईल मध्ये देण्यात आलेला डिस्प्ले 720  निट्स ब्राईटनेस प्रदान करतो. या स्मार्टफोनमध्ये 7 nm फॅब्रिकेशन वर बनवण्यात आलेले मीडियाटेक डायमेंसिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसर उपलब्ध आहे. OPPO A2x हा स्मार्टफोन android 13 वर बेस्ड कलर OS 13.1 वर काम करतो. या स्मार्टफोनला IP54 रेटिंग देण्यात आली आहे. त्यामुळे हा मोबाईल पाणी -धूळ यापासून सुरक्षित राहतो.

कॅमेरा– OPPO A2x

OPPO A2x मध्ये कंपनीकडून ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल विथ LED फ्लॅश, आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल मध्ये उपलब्ध आहे.कंपनीने या मोबाईल मध्ये 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज आणि 12 GB रॅम  + 256 GB स्टोरेज  उपलब्ध केले आहे . या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

अन्य फिचर्स

OPPO A2x या स्मार्टफोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इंबेडेड पावर बटन उपलब्ध आहे. त्याचबरोबर मोबाईलच्या लोवर फ्रेम वर लाऊड स्पीकर देण्यात आले आहे. हा स्पीकर 300% सुपर वोल्युम आउटपुट देतो. या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर 4096 लेव्हल स्मार्ट डिमिंग म्हणजेच  24/7 AI  प्रोजेक्शन फंक्शन उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे मोबाईल वापरत असताना डोळे सुरक्षित राहतील. कंपनीने OPPO A2x मध्ये ड्युअल मोड 5g, ड्युअल सिम, वाय-फाय आणि ब्लूटूथ यासारखे फीचर्स दिले आहे.

स्टोरेज व्हेरिएंट आणि किंमत

OPPO A2x हा स्मार्टफोन कंपनीने २ स्टोरेज वेरीएंट मध्ये लॉन्च केला आहे. यामध्ये 6 GB रॅम  आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या बेस व्हेरियंटची किंमत 1099 yuan म्हणजेच भारतीय चलनानुसार 12,599 रुपये आहे. आणि 8 GB रॅम  256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1399 yuan म्हणजेच 15,999 रुपये आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये देखील लॉंच करण्यात येणार आहे. हा मोबाईल तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये ब्लॅक गोल्ड आणि पर्पल या ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.