Oppo ने लाँच केला खिशाला परवडणारा मोबाईल; 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन बरंच काही

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचं नाव Oppo A38 असं आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या बजेट सिरीजचा एक भाग आहे. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन UAE मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर ग्राहकांना भारतीय बाजारपेठेमध्ये हाच स्मार्टफोन कधी लॉन्च होणार याची उत्सुकता लागली होती. आता हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन कलर व्हेरीएंट मध्ये लॉन्च केला आहे. आज आपण Oppo A38 चे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.

   

6.56 इंच डिस्प्ले –

Oppo A38 या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD + LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट सह येत असून 720 नीटस पीक ब्राईटनेस निर्माण करतो. या स्मार्टफोनमध्ये Octacore Media Tek Helio G85 प्रोसेसर देण्यात आले आहे. यासोबतच स्मार्टफोन Android 13 वर बेस्ड colour OS 13.1 वर काम करेल. Oppo A38 मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33W SUPPER VOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा

Oppo A38 या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यात ड्युअल रीयर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यापैकी प्रायमरी कॅमेरा 50 MP, सेकंडरी कॅमेरा 2MPचा देण्यात आलाय तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. जर तुम्हाला आणखीन स्टोरेज हवी असेल तर तुम्ही एसडी कार्ड च्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवू शकता.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Oppo A38 मध्ये ड्युअल सिम सपोर्ट, ब्लूटूथ 5.0, 4G VoLTE, वाय फाय, जीपीएस, यूएसबी सी पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक आणि साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत किती

Oppo A38 या स्मार्टफोनमध्ये ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग गोल्ड हे कलर ऑप्शन देण्यात आले आहे. Oppo A38 या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये एवढी असून तुम्ही हा स्मार्टफोन प्री-ऑर्डर करू शकता. हा फोन 13 सप्टेंबरला फ्लिपकार्ट आणि ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी जाईल.