टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने भारतीय बाजारात ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. OPPO A3x 5G असे या मोबाईलचे नाव असून या मोबाईलच्या माध्यमातुन अतिशय स्वस्त किमतीत तुम्ही 5G मोबाईल खरेदी करू शकता. 4GB रॅम, 8-मेगापिक्सलचा कॅमेरा, 5,100mAh बॅटरी यांसारख्या फीचर्सने हा मोबाईल सुसज्ज आहे. आज आपण ओप्पोच्या या नव्या स्मार्टफोनचे संपूर्ण डिटेल्स आणि त्याची किंमत अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात…
6.67-इंचाचा डिस्प्ले –
OPPO A3x 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला HD+ रिझोल्यूशन आणि 1,000 nits पीक ब्राइटनेस मिळतो. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 6nm MediaTek Dimensity 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसर बसवण्यात आला असून हा मोबाईल Android 14 OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. खास बाब म्हणजे तुमची बोटे ओली किंवा चिकट असली तरीही सेंटर -एलाइन्ड पंच-होल कटआउट स्क्रीनला सुपर रिस्पॉन्सिव्ह ठेवते. मिलिटरी-ग्रेड MIL-STD 810H टेस्टिंगमध्ये हा स्मार्टफोन यशस्वी झाला असून हा मोबाईल शॉक आणि ड्रॉप प्रतिरोधक आहे. याशिवाय सुरक्षिततेसाठी, स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
कॅमेरा – OPPO A3x 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, OPPO A3x 5G मध्ये पाठीमागील बाजूला 8-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि समोर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी यामध्ये 5,100mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रॅम आणि स्टोरेजबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 4GB रॅम + 128GB स्टोरेज असे २ पर्याय देण्यात आलेत. व्हर्च्युअल रॅमच्या माध्यमातून तुम्ही आणखी 4GB रॅम वाढवू शकता.
किंमत किती?
OPPO A3x 5G च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये आहे. हा मोबाईल स्टाररी पर्पल, स्पार्कल ब्लॅक आणि स्टारलाईट व्हाईट कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. येत्या ७ ऑगस्टपासून OPPO च्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवरून हा मोबाईल तुम्ही खरेदी करू शकता.