Oppo A60 मोबाईल 8GB RAM, 50 MP कॅमेरासह लाँच; किंमत किती पहा

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल ब्रँड Oppo ने जागतिक बाजारात Oppo A60 मोबाईल लाँच केला आहे. कंपनीने आपल्या A सीरीज अंतर्गत हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा असे दमदार फीचर्स या मोबाईल मध्ये देण्यात आलेले आहेत. आज आपण ओप्पो च्या या स्मार्टफोनबाबत A टू Z माहिती आणि त्याची किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात ….

   

6.67-इंचाचा डिस्प्ले –

Oppo A60 मध्ये कंपनीने 90Hz रीफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेला 1604 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 950 nits चा पीक ब्राइटनेस मिळतो. मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन 680 4G चिपसेट वापरण्यात आली असून ओप्पोचा हा स्मार्टफोनAndroid 14 वर आधारित ColorOS 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 128GB आणि 256GB स्टोरेज पर्याय देण्यात आले आहेत. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

कॅमेरा – Oppo A60

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आलाय. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी यामध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. याशिवाय धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी कंपनीने याला IP54 रेटिंग दिली आहे. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास ओप्पो च्या या मोबाईल मध्ये ड्युअल स्पीकर, 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या किमतीचा, तर Oppo A60 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 5,490,000 VND (सुमारे 18,000 रुपये) आणि 8 GB RAM आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत VND 6,490,000 (अंदाजे 21,000 रुपये) आहे. कंपनीने हा मोबाईल ब्लू पर्पल आणि ब्लू कलरमध्ये लॉन्च केला आहे.