Oppo A77s फक्त 1149 रुपयांत; Flipkart वर बंपर ऑफर

टाइम्स मराठी । अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या डील मध्ये ग्राहकांना परवडेल अशा वेगेवेगळ्या ऑफर आपण पाहत असतो. त्यातच तुम्ही जर नवीन मोबाईल घेणार असाल तर आज आम्ही तुम्हाला एक खास ऑफर सांगणार सांगणार आहोत. फ्लिपकार्ट वर Oppo A77s हा 16,499 रुपयांचा मोबाईल फक्त 1149 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. ही ऑफर नेमकी काय आहे हे आज आपण जाणून घेउयात ….

   

काय आहे ऑफर –

फ्लिपकार्ट वर Oppo A77s हा मोबाईल 28% डिस्काउंट सह 16,499 रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट वरून तुम्ही हा मोबाइल खरेदी करणार असाल तर आणि एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून तुम्ही पेमेंट केले तर तुम्हाला चार हजार रुपयांची सूट मिळेल. जर तुम्ही Induslnd bank credit card यावरून पेमेंट केले तर तुम्हाला दहा टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. महत्त्वाचे म्हणजे फ्लिपकार्टने Oppo A77s च्या खरेदीवर १५३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिलेली आहे. म्हणजेच तुमच्याकडे असलेला जुना मोबाईल देऊन तुम्ही अवघ्या 1149 रुपयांत नवीन मोबाईल खरेदी करू शकता. परंतु जुन्या मोबाईलच्या कंडिशन वर त्या मोबाईलची किंमत ठरवली जाईल.

Oppo A77s चे फीचर्स पहा –

Oppo A77s मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56 इंचाचा HD+ Display देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिजोल्युशन 720×1612 असून मोबाईल मध्ये स्नॅपड्रेगन 680 चिपसेट बसवण्यात आली आहे. मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायच झाल्यास, 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूस 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. Oppo A77s मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33 वॅटच्या SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप सी, GPS, हेडफोन जॅक हे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आलेले आहे.