Oppo A78 4G भारतात लाँच; 50 MP कॅमेरा, 5000 mAah बॅटरी अन बरंच काही….

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपला नवा स्मार्टफोन Oppo A78 4G भारतात लाँच केला आहे. यापूर्वी ग्लोबल मार्केट मध्ये कंपनीने हा मोबाईल लाँच केला होता. आता भारतीय बाजारात हा मोबाईल आला असून हा स्मार्टफोन दोन कलर उपलब्ध आहे. यामध्ये मिस्ट ब्लॅक आणि ऍक्वा ग्रीन कलरहा समावेश आहे. आज आपण या मोबाईलचे फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेऊयात.

   

6.43 इंच डिस्प्ले-

Oppo A78 4G या स्मार्टफोनमध्ये 2400 ×1080 पिक्सल रिझोल्युशन असलेला 6.43 इंच चा फुल एचडी पंच होल डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले AMOLED फायनल वर तयार करण्यात आलेला असून 90 hz रिफ्रेश रे सह उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील उपलब्ध करून दिले आहे. Oppo A78 4G या स्मार्टफोनच्या प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित कलर ओएस 13 वर लॉन्च करण्यात आलेला असून हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसर वर काम करते. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ग्राफिक्स साठी एड्रेनो 610 जीपीयू दिला आहे.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी बॅग पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात F/1.8 अपर्चर सह 50 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दोन मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर कॅमेरासह सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo A78 4G या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम सह 256 GB इनबिल्ड स्टोरेज देण्यात आलेले आहे. यासोबतच पावर बॅकअप साठी स्मार्टफोन मध्ये 5000 mAah बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी ओपो मोबाईलमध्ये 67 W सुपर वुक टेक्नॉलॉजीचा चार्जर देण्यात आली आहे.

किंमत किती ?

Oppo A78 4G या स्मार्टफोनची किंमत 17,499 रुपये एवढी असून तुम्ही हा स्मार्टफोन ऑफलाइन रिटेल स्टोअर वर जाऊन खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनवर 1500 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे.