Oppo A78 ची किंमत झाली स्वस्त; पहा किती रुपयांत खरेदी करता येईल

टाइम्स मराठी । स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक वेगवेगळ्या ऑफर्सची वाट पाहत असतात. ज्यामुळे कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येईल. त्यानुसार आता तुम्ही देखील नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु तुम्हाला स्वस्तात मोबाईल खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर घेऊन आलो आहोत. या ऑफर अंतर्गत तुम्ही Oppo A78 हा मोबाईल कमी किमतीत खरेदी करू शकाल. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

   

काय आहे ऑफर?

Oppo A78 4G  हा स्मार्टफोन दोन कलर उपलब्ध आहे. यामध्ये मिस्ट ब्लॅक आणि ऍक्वा ग्रीन कलर उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारपेठेमध्ये 17,499 एवढी आहे. परंतु कंपनीने या मोबाईलच्या किमतीमध्ये घट करून युजर्स ला एक स्पेशल गिफ्ट दिले आहे. त्यानुसार ग्राहक हा स्मार्टफोन 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह 16,499 मध्ये खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर कंपनीकडून या स्मार्टफोनवर बँक ऑफर देखील उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार आणखीन कमी किमतीमध्ये तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकतात.

स्पेसिफिकेशन

Oppo A78 4G या स्मार्टफोनमध्ये 2400 ×1080 पिक्सल रिझोल्युशन असलेला 6.43 इंचचा फुल HD पंच होल डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले AMOLED फायनल वर तयार करण्यात आलेला असून 90 hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. त्याचबरोबर या मोबाईल मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील उपलब्ध करून दिले आहे. Oppo A78 4G या स्मार्टफोनच्या प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित कलर OS 13 वर लॉन्च करण्यात आलेला आहे. तसेच हा मोबाईल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसरवर काम करतो.

कॅमेरा

Oppo A78 4G मध्ये फोटोग्राफीसाठी बॅग पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात F/1.8 अपर्चर सह 50 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर कॅमेरा देण्यात आलेला आहे.  त्याचबरोबर 2 मेगापिक्सल  डेप्थ सेंसर कॅमेरासह सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo A78 4G मध्ये 8 GB रॅम सह 256 GB इनबिल्ड स्टोरेज देण्यात आलेले आहे. यासोबतच पावर बॅकअप साठी स्मार्टफोन मध्ये 5000 mAah ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.  ही बॅटरी 67 W फास्ट चार्जला सपोर्ट करते.