टाइम्स मराठी । आजकाल 5G आणि फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याकडे तरुण पिढीची मोठ्या प्रमाणात चलती आहे. त्यानुसार बऱ्याच कंपन्या आता नवीन जनरेशनचे पोर्टेबल मोबाईल डेव्हलप करत असून या Samsung नंतर आता Oppo कंपनीने देखील OPPO FIND N3 FLIP हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा मोबाईल 2 व्हेरिएंट मध्ये लॉंच केला आहे. यामध्ये क्रीम गोल्ड आणि सिल्क ब्लॅक हे दोन कलर ऑप्शन उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टच्या वेबसाईट वरून खरेदी करू शकतात.
स्पेसिफिकेशन
OPPO FIND N3 FLIP या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच AMOLED LTPO प्रायमरी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2520 × 1080 पिक्सेल रीजोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1600 निट्स पीक ब्राईटनेस देतो. या मोबाईलच्या फ्रंट साईडने 3.26 इंचचा AMOLED कवर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 × 382 पिक्सेल रिझोल्युशन आणि 900 निट्स पीक ब्राईटनेस प्रदान करतो.
बॅटरी
OPPO FIND N3 FLIP मध्ये मीडियाटेक डायमेन्शन 9200 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड colorOS 13.2 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 4300 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 44 W चा SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध केले आहे.
कॅमेरा
OPPO FIND N3 FLIP या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. हा कॅमेरा सेटअप हसलब्लॅंड कॅमेरा टेक्नॉलॉजी सोबत उपलब्ध आहे. त्यानुसार या मोबाईलमध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा 48 मेगापिक्सल, टेलीफोटो लेंस 32 मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
किंमत–
OPPO FIND N3 FLIP हा मोबाईल कंपनीने दोन व्हेरियंट मध्ये लॉन्च केला आहे. त्यानुसार 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 94,999 एवढी आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट च्या माध्यमातून तुम्ही खरेदी करू शकता. Oppo कंपनीने या स्मार्टफोनवर ऑफर देखील उपलब्ध केले आहेत. त्यानुसार ग्राहकांना हा मोबाईल खरेदी केल्यास डिस्काउंट मिळू शकतो. जर तुम्ही हा मोबाईल SBI card, ICICI bank card, Kotak Mahindra card, one card, Bajaj Finsarv, TVS क्रेडिट, HDFC Bank कार्डच्या माध्यमातून खरेदी करणार असाल तर बारा हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. आणि 24 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध होऊ शकतो. कंपनीने Oppo या स्मार्टफोनवर 8000 रुपयांपर्यंत बोनस देखील उपलब्ध केला आहे. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन 74,99 मध्ये खरेदी करू शकता.