टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Oppo ने फ्लिप फोन नंतर आता फोल्डेबल मोबाईल लाँच केला आहे. Oppo Find N3 असे या मोबाईलचे नाव आहे. हा स्मार्टफोन ओपन केल्यानंतर नोटबुक प्रमाणे दिसतो. या मोबाईलच्या मागच्या साईडने सर्क्युलर कॅमेरा आयलँड उपलब्ध करण्यात आला आहे. आणि सेल्फी साठी यामध्ये पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने स्मार्टफोनच्या एका साईडने ग्लास फिनिशिंग तर दुसऱ्या साईडने वेगन लेदर फिनिशिंग उपलब्ध केलं आहे. यामुळे हा हँडसेटचा लूक अतिशय जबरदस्त दिसत आहे.
स्पेसिफिकेशन
Oppo Find N3 या स्मार्टफोनमध्ये 7.82 इंच चा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2440×2268 पिक्सल रिझोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट सह येतो. त्याचबरोबर हा डिस्प्ले 2800 नीट्स पीक ब्राईटनेस देतो. या स्मार्टफोन मध्ये कव्हर डिस्प्ले हा 6.31 इंच चा AMOLED पॅनल सह देण्यात आला आहे. यामध्ये 2484 × 1116 पिक्सल रिझोल्युशन आणि 10-120 hz रिफ्रेश रेट मिळतो.
प्रोसेसर
Oppo Find N3 या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 Soc प्रोसेसर देण्यात आले आहे. हा फोर्डेबल स्मार्टफोन तुम्ही जेव्हा फोल्ड कराल, तेव्हा 2 डिस्प्ले डॉल्बी व्हिजन, 2800 निट्स पीक ब्राईटनेस आणि एलटीपीओ 3.0 या टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल . या मोबाईल मध्ये 4805 mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा
Oppo Find N3 मध्ये कंपनीने 48 मेगापिक्सेल स्टॅक्ड प्रायमरी कॅमेरा उपलब्ध केला आहे. यासोबतच 48 मेगापिक्सेल अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा टेलिकॉम फोटो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी मोबाईल मध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. त्याच वेळी, बाहेरील स्क्रिनवर 32 मेगापिक्सलचा दुसरा एक सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे.
किंमत किती ?
Oppo Find N3 हा मोबाईल कंपनीने चार कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. यामध्ये ब्लॅक, रेड, ग्रीन आणि गोल्ड कलर उपलब्ध आहे. रेड आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध असलेले स्मार्टफोन लेदर फिनिशिंग मध्ये मिळतो. तर ग्रीन आणि गोल्ड कलर मध्ये उपलब्ध असलेला मोबाईल मॅट ग्लास फिनिशिंग मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज मिळतंय. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास या स्मार्टफोनची किंमत 2,399 सिंगापूर डॉलर एवढी आहे.