टाइम्स मराठी । Oppo कंपनी पुढच्या वर्षी नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च करणार आहे. नवीन अपकमिंग स्मार्टफोन सिरीज मध्ये कंपनी दोन स्मार्टफोन लाँच करेल. या दोन्ही मोबाईलचे नाव OPPO FIND X7 आणि FIND X7 PRO असेल. कंपनी या फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज मध्ये नेक्स्ट जनरेशन हैसलब्लॅंड हायपर टोन कॅमेरा सिस्टीम सादर करू शकते. हा स्मार्टफोन ऑफिशिअल लॉन्च होण्यापूर्वीच या मोबाईलचे फोटोज लीक करण्यात आले आहे. त्यानुसार या स्मार्टफोनची डिझाईन आणि कॅमेरा मॉडेल बद्दल माहिती उपलब्ध झाली आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करण्यात येणार असलेल्या कॅमेरा आणि फीचर्स याबाबत.
लीक इमेज डिझाईन
OPPO FIND X7 PRO या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये सेल्फी साठी पंच होल कट आउट मिळेल. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये कर्व एज मिळू शकते. यासोबतच स्मार्टफोन लॉक अनलॉक करण्यासाठी यामध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येऊ शकतो . हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्ट सह उपलब्ध होईल.
कॅमेरा
OPPO FIND X7 PRO या स्मार्टफोनच्या लीक झालेल्या फोटोमध्ये पूर्णपणे कॅमेरा मॉड्युल दिसत आहे. त्यानुसार स्मार्टफोनच्या बॅक साईड ने ऑक्टागोन आकारात मोठे कॅमेरा मॉड्युल देण्यात येईल. या मॉड्युलमध्ये 4 कॅमेरा सेंसर आणि LED फ्लॅश असेल. या 4 कॅमेरा सेंसरपैकी दोन मोठे पेरिस्कोप सेन्सर असेल. या स्मार्टफोन मध्ये अल्ट्राव्हाइड अँगल लेंस देण्यात येतील.
प्रोसेसर
OPPO FIND X7 PRO मध्ये BOE किंवा SAMSUNG E7 प्रमाणे पॅनल मिळेल. या स्मार्टफोनचे बेस्ट व्हेरियंट BOE X1 स्क्रीन सह उपलब्ध करण्यात येणार आहे. हे पॅनल ONEPLUS आणि BOE ने डेव्हलप केले आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर किंवा Mediatek Dimensity 9300 प्रोसेसर देण्यात येईल.