Oppo K12x : 12GB RAM, 50MP कॅमेरासह Oppo ने लाँच केला दमदार मोबाईल

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड OPPO ने जागतिक बाजारात नवा मोबाईल लाँच केला आहे. Oppo K12x असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 12GB RAM, 5500mAh बॅटरी सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच फोटोग्राफी साठी 50MP कॅमेरासुद्धा यामध्ये उपलब्ध आहे. चीनमध्ये सध्या या स्मार्टफोनचे लॉन्चिंग करण्यात आलं असून त्याची सुरुवातीची किंमत 14,988 रुपये इतकी आहे. आज आपण या स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…

   

6.67-इंचाचा डिस्प्ले –

Oppo K12x मध्ये 6.67-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 1080×2400 चे पिक्सल रिझोल्युशन आणि 1200 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस मिळतोय. हाच ब्राईटनेस HDR व्हिडिओ प्लेबॅक सारख्या परिस्थितींमध्ये, 2100 nits पर्यंत जाऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे .ओप्पोच्या या मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर बसवण्यात आला आहे. ओप्पोचा दावा आहे की K12x मोबाइलला मुले यूजर्सच्या डोळ्यांना कमीतकमी हानी पोहोचवेल कारण त्याचे हार्डवेअर डिस्प्लेमधून उत्सर्जित होणारा निळा प्रकाश कमी करतो.

कॅमेरा – Oppo K12x

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास,Oppo K12x मध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे, तसेच यासोबत 2MP डेप्थ सेन्सर देखील मिळतोय. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी 16 MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी Oppo च्या या स्मार्टफोनमध्ये 5500 mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Oppo K12x च्या 8GB + 256GB मॉडेलची किंमत 1299 युआन (अंदाजे 14,988 रुपये) आहे. त्याच्या 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 1499 युआन (अंदाजे रु. 17,296) आहे, तर टॉप व्हेरिएंट असलेल्या 12GB + 512GB हँडसेटची किंमत 1799 युआन (रु. 20,758) आहे. हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे. ग्राहक ग्रीन आणि ग्रे रंगात हा मोबाईल खरेदी करू शकतात.