Oppo ने Reno 10 सिरीज अंतर्गत लाँच केले 3 दमदार मोबाईल; पहा किंमत अन् फीचर्स

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने भारतात तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहे. हे स्मार्टफोन Reno 10 च्या सिरीज मधील असून अनेक जबरदस्त फीचर्सने परिपूर्ण आहेत. Reno 10, Reno 10 pro, Reno 10 Pro plus + असं या मोबाईलचे नाव आहे. Oppo च्या या नवीन रेनो सिरीज मधील सर्व स्मार्टफोन Android 13 वर आधारित ColorOS 13.1 वर चालतात. आज आपण या तिन्ही मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊया……

   

1) Oppo Reno 10 5G-

Oppo Reno 10 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.7-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये ऑक्टा-कोर 6nm MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 64-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 32-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo Reno 10 5G ला 5,000mAh बॅटरी मिळते. ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला संपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा फोन 47 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो.

2) Oppo Reno 10 Pro 5G-

Oppo Reno 10 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळतो. स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 778G 5G प्रोसेसर उपलब्ध असून 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 32 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या मोबाईलला 4,600mAh बॅटरी देण्यात आली असून 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Oppo Reno 10 Pro 5G च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे

3) Oppo Reno 10 Pro+ 5G-

Oppo Reno 10 Pro+ 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.74 इंचाचा AMOLED 3D कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाइल मध्ये 12GB LPDDR5 रॅमसह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा सेकंडरी अँगल कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-एंगल लेन्स आहे. तसेच विडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Oppo Reno 10 Pro Plus मध्ये 4,700mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Oppo Reno 10 Pro + 5G च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे