Oppo ने लॉन्च केली Reno 11 सिरीज; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी | Oppo ही स्मार्टफोन निर्माता कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता ओप्पो कंपनीने  Oppo Reno 11 सिरीज लॉन्च केली असून या सिरीज मध्ये 2 Mobile उपलब्ध केले आहे. या स्मार्टफोनचे नाव  Oppo Reno 11 आणि Oppo Reno Pro असे आहे. या दोन्ही मोबाईल मध्ये सेम फीचर्स देण्यात आले असून  कंपनीने हा मोबाईल चीनमध्ये लॉन्च केला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च होऊ शकतो.

   

किंमत किती?

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, Oppo Reno 11 च्या 8GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच  भारतीय चलनानुसार 35,624 रुपये आहे.  तर Oppo Reno 11 Pro च्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत  CNY 3499 म्हणजेच 41,564 रुपये आहे.

स्पेसिफिकेशन

Oppo Reno 11 या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंच चा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  120  hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 8200 प्रोसेसर देण्यात आले आहे.  तर दुसरीकडे Oppo Reno 11 Pro मध्ये 6.74 इंच चा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1.5 k रिझोल्युशन आणि 120  hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या दोन्ही वेरियंटमध्ये कंपनीने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 +Gen 1 प्रोसेसर दिला आहे

कॅमेरा

Oppo Reno 11 या मोबाईल मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्यानुसार यामध्ये 50 MP LYT600 प्रायमरी कॅमेरा, 8 MP IMX355 आणि 32 MP  IMX709 टेलीफोटो सेंसर, 32 MP IMX709 फ्रंट कॅमेरा  मिळतो. तर Oppo Reno 11 Pro मध्ये कंपनीने  ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. त्यानुसार यामध्ये 50 MP Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा, 8 MP  IMX355 कॅमेरा, 32 MP IMX709 टेलीफोटो सेंसर,  32 MA फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Oppo Reno 11 या स्मार्टफोन मध्ये कंपनीने 4800 mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 67 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर Oppo Reno 11 Pro व्हेरियंटमध्ये 4700 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने सिक्युरिटी साठी दोन्ही मोबाइल मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट दिले आहे.