टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेमध्ये बऱ्याच मोबाईल निर्माता कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. अशातच आता प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo सुद्धा फोल्डेबल मोबाईल तयार करण्याच्या तयारीत असून याबाबतचा टिझर सुद्धा कंपनी कडून लाँच करण्यात आला आहे. Oppo च्या या अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोनचे नाव FIND N3 FLIP असे असणार आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
6.8 इंच डिस्प्ले-
FIND N3 FLIP या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच चा फुल एचडी फोल्डेबल AMOLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेट सह येईल. त्याचबरोबर या मोबाईलचा कव्हर डिस्प्ले 3.26 इंचचा असेल. या स्मार्टफोनमध्ये डायमेनसिटी 9200 चिपसेट देण्यात येऊ शकतो. यासोबतच 4300 MAH बॅटरी प्रदान करण्यात येऊ शकते. ही बॅटरी 44 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
कॅमेरा-
मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, FIND N3 FLIP या स्मार्टफोनच्या टीझरनुसार या मोबाईल मध्ये SONY IMX890 सेन्सर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात येणार आहे. यासोबतच 32 मेगापिक्सेल टेलीफोटो शूटर IMX709 कॅमेरा देण्यात येऊ शकतो. हा कॅमेरा 50 mm फोकल लेंथ आणि 2x ऑप्टिकल झूम यासह उपलब्ध होईल. याशिवाय रियर मध्ये SONY IMX581 सेन्सर असलेल्या 48 मेगापिक्सल अल्ट्रावाईड अँगल सेंसर देण्यात येणार आहे. हा कॅमेरा 114 डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यू आणि ऑटो फोकस सपोर्ट ऑफर करेल. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येणार आहे. हा फ्रंट कॅमेरा डिस्प्ले पंच होलमध्ये उपलब्ध होईल.