टाइम्स मराठी | जगातील प्रगत देशांच्या यादीत जर्मनी या देशाचे नाव घेतले जाते. जर्मनी हा देश आधुनिक तंत्रज्ञानामुळे विकासाचे टप्पे गाठत आहे. आता याचं जर्मनीत ऑरगॅनिक फॉईल सोलर सेल बनवण्यात आली आहे. या सोलर सेल भिंतींवर आणि छतावर बसवता येऊ शकतात. ऑरगॅनिक फॉईल (Solar Foil) सोलर वीज निर्माण करण्याचे काम करते. ज्यामुळे जास्त लाईट बिल येण्याचा प्रश्नच मिटतो. या सोलर फॉईल अत्यंत हलक्या आणि लवचिक आहेत. त्याचे वजन देखील तितकेच आहे. यामुळे याचा वापर कुठे ही करणे सहज शक्य होते. सध्या जर्मनीत या फॉईल सोलरची जास्त मागणी होत आहे.
जर्मनी येथील हेलिऍटेक (Heliatek) नावाची कंपनी अशा प्रकारची फॉईल तयार करते. या अनोख्या टेक्निकसाठी कंपनीला कोणत्याही सप्लायर्स वर अवलबूंन राहण्याची सुद्धा गरज भासत नाही कारण हायड्रो कार्बन हे सगळीकडेच उपलब्ध असते. लॉजिस्टिक ऑडिटेल कंपन्या या फॉईलचा वापर आपल्या गोदामांमध्ये करतात. यामुळे त्यांचे पैशांची बचत होऊन यातून त्यांना मोठा फायदा देखील होतो. या फॉईल ला आपण सहजरीत्या खिडक्यांवर किंवा टँकवर लावू शकतो. हेलिऍटेक कंपनी सध्या या फॉईलमध्ये आणखीन विकास करण्याच्या प्रयत्नात आहे.
दरम्यान, भारतात देखील विजनिर्मितीचे अडथळे त्या संदर्भातील प्रश्न मोठे आहेत. त्यामुळे भविष्यात जर भारताने देखील या फॉईलसोलारचा वापर करण्याचा विचार केला तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. तसेच, नागरिकांचा सतत लाईट बिल भरण्याचा प्रश्न मिटू शकतो. ही फॉईल सोलर स्वतः वीज निर्माण करत असल्यामुळे यासाठी वेगळे कोणते तंत्रज्ञान वापरण्याची देखील गरज नाही. हीच बाब कंपन्याच्या देखील लक्षात आल्यामुळे जर्मनीत फॉईलची मोठी मागणी होत आहे.
सोलर पॅनल
भारतात सोलर पॅनलची सर्वात जास्त मागणी आहे. परंतु या सोलर पॅनलच्या किंमती देखील तितक्याच आहेत. पुरेशी वीज निर्माण करण्यासाठी या पॅनलचा जास्त फायदा होतो. विजेचे दर वाढल्यामुळे आणि ते नागरिकांना परवडत नसल्यामुळे जास्त प्रमाणात घरांवर सोलर पॅनल बसवले जातात. मात्र त्याचे वजन आणि किंमत देखील तितकीच मोजावी लागते. मात्र याच्या उलट ऑरगॅनिक फॉईल सोलर परवडणारे आणि वजनाने कमी आहे. याचा वापर कुठे ही करता येऊ शकतो.