Orxa Mantis बाईक भारतात लॉन्च; अग्रेसिव्ह लुक मध्ये उपलब्ध 

टाइम्स मराठी | आज-काल इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये सर्वसामान्य नागरिकांचा कल पाहता,  बऱ्याच टू व्हीलर निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लक आजमावत आहेत. अशातच आता इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आणखीन एक बाईक लॉन्च करण्यात आली आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या बाईकचे नाव  ORXA MANTIS आहे. कंपनीने ही बाईक स्पोर्ट्स लुक्स मध्ये  लॉन्च केली असून ही हाय स्पीड बाईक आहे. आज जाणून घेऊया या बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

किंमत

ORXA MANTIS या बाईक मध्ये  देण्यात आलेली मोटर आणि बॅटरी पॅक वर 30,000 km पर्यंत आणि 3 वर्षांपर्यंत वॉरंटी देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक बाइक च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, 1.3 kw चार्जिंग सॉकेट असलेल्या बाईकची एक्स शोरूम किंमत  3.6 लाख रुपये एवढी आहे. कंपनीने ग्राहकांसाठी या बाईकची ऑनलाईन बुकिंग सुरू केली आहे. त्यानुसार ग्राहक कंपनीच्या अधिकारीक वेबसाईटवरून ही गाडी बुक करू शकतात. याशिवाय  बुकिंग साठी पहिल्या 1000 ग्राहकांना बुकिंग राशी 10,000 रुपये जमा करावी लागेल. त्यानंतर बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना राशी 25,000 रुपये जमा करावी लागेल.

बॅटरी

ORXA MANTIS या इलेक्ट्रिक बाइक मध्ये 8.9 KWH बॅटरी सेटअप देण्यात आले आहे. या बॅटरी सोबतच लिक्विड कोल्ड मोटर देखील देण्यात आली आहे. ही मोटर लॉंग रूटवर जास्त गरम होत नाही. ही इलेक्ट्रिक बाईक 28 hp पावर आणि 93 NM टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक बाइक मध्ये  बॅटरी चार्ज करण्यासाठी 1.3 kw आणि 20.5 kw सॉकेट  देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक बाइक 8.9 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रतितास रेंज पकडण्यास सक्षम आहे.

फीचर्स

ORXA MANTIS या इलेक्ट्रिक बाइकचा फ्रंट लुक हा अत्यंत अग्रेसिव देण्यात आला आहे. या बाईकमध्ये लीनक्स बेस्ड ओरक्सा ऑपरेटिंग सिस्टीम,  ऑल LED लाइटिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन सह मेंटिस ॲप, मोबाईल नोटिफिकेशन, राईट ऍनालिटीक्स यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. याशिवाय 5.0 इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर  देखील यामध्ये देण्यात आले आहे.