Oukitel ने लॉन्च केला नवीन वॉटरप्रूफ टॅबलेट; एकदा चार्ज केल्यावर 6 महिने चालणार

टाइम्स मराठी | Oukitel या कंपनीने जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ टॅबलेट लॉन्च केला आहे. आज-काल आयफोन लॅपटॉप टॅबलेट आणि स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या डिव्हाइसेसची वाढते डिमांड बघून प्रत्येक कंपनी बाजारात टिकून राहण्यासाठी एकापेक्षा एक असे डिवाइसेस लॉन्च करत आहे. आता एप्पल, लिनोवो यासारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Oukitel ने नवीन टॅबलेट लॉन्च केला आहे. हा टॅबलेट फाईव्ह जी कनेक्टिव्हिटी सोबत उपलब्ध असून हा एक रग्ड टॅबलेट आहे. हा टॅबलेट युजर्स कोणत्याही सिच्युएशन मध्ये वापरू शकतात.

   

Oukitel कंपनीने जेव्हा RT6 टॅबलेट मार्केटमध्ये लॉन्च केला होता. तेव्हा युजर्स ला हा टॅबलेट प्रचंड आवडला होता. आता अशाच प्रकारचा जास्त मजबूत आणि दमदार डिझाईन मध्ये असलेला टॅबलेट कंपनीने लॉन्च केला आहे. या टॅबलेट च नाव Oukitel RT7 Titan 5G हे आहे. हा टॅबलेट कितीही उन्हात पाण्यात वापरला तरी देखील तो खराब होणार नाही. हा टॅबलेट पाणी ऊन आणि धूळ या सर्व गोष्टींचा सामना सहजरीत्या करतो.

Oukitel RT7 Titan 5G कॅमेरा

Oukitel RT7 Titan 5G या टॅबलेटला MIL-STD-810 G आणि IP68/IP69K मीटिंग देण्यात आली आहे. या रेटिंग चा अर्थ हा टॅबलेट पाणी धूळ ऊन या सर्व गोष्टींचा सामना करू शकतो. यामध्ये शॉक प्रूफ बंपर आणि रबर कोटिंग करण्यात आली आहे. यासोबतच टॅबलेट मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या कॅमेरा मध्ये प्रायमरी कॅमेरा 48 MP, सेकंडरी कॅमेरा 20 MP, आणि मायक्रो कॅमेरा 2MP याशिवाय फ्रंट मध्ये 8MP कॅमेरा देण्यात आलेला आहे.

Oukitel RT7 Titan 5G किंमत

Oukitel RT7 Titan 5G टॅबलेट ची किंमत AliExpress वर 1,004.81 डॉलर म्हणजेच भारतीय करन्सीनुसार 83,475 रुपये एवढी आहे. परंतु 311.49 डॉलर म्हणजे 25,877 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

Oukitel RT7 Titan 5G स्पेसिफिकेश

Oukitel RT7 Titan 5G टॅबलेट मध्ये 10.1 इंच IPS डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या टॅबलेट मध्ये मीडिया टेक डायमेन्शन 720 प्रोसेसर उपलब्ध आहे. यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध असून 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. या टॅबलेट मध्ये 32000mAh बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 180 दिवसांपर्यंत चालते.