अरेरे!! पाणीपुरी वरून फ्री स्टाईल हाणामारी; सोशल मीडियावर Video व्हायरल

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर आज काल वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी एंटरटेनमेंट करणारे तर कधी कोणत्या शहरात काय चाललं आहे हे समजवणारे असतात. बरेचदा सोशल मीडियावर हाणामारीचे व्हिडिओज प्रचंड व्हायरल होतात. व्हिडिओज पाहायला नेटकऱ्याना देखील मज्जा येते. तर बऱ्याचदा वायरल झालेला व्हिडिओ पाहून त्रासही होतो. त्याच प्रकारे एका ठिकाणी कस्टमर आणि ग्राहकांमध्ये पाणीपुरी वरून वाद झाल्याचा आणि यंत्र फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

   

ही घडलेली घटना हमीरपुर येथील आहे. या ठिकाणी रामसेवक नावाचा एक तरुण पाणीपुरी विकतो. या पाणीपुरीवाल्याकडे दहा रुपयांमध्ये पाच पुऱ्या असा रेट आहे. परंतु एका गावातील तरुणाने त्याला दहा रुपयात सातपुऱ्या देण्यास सांगितले. आणि वाद वाढला. त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असावा. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलीस या दोन्ही व्यक्तींच्या तपास करत आहे.

पाणीपुरी वरून झालेल्या भांडणाचा व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईल मध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये दोघेजण भर रस्त्यात हाणामारी करत असल्याचे दिसून येतं. आणि रस्त्यावरून येणारे जाणारे लोक ते भांडण बघत आहेत. हे दोन व्यक्ती अशाप्रकारे भांडत आहे जसं की त्यांचा कुस्तीचा सामना सुरू आहे. हा व्हिडिओ ट्विटर वर @gharkekalesh या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.9 k लाईक मिळाल्या असून नागरिकांनी वेगवेगळ्या कमेंट्स यावर केले आहे.