PayTM चा कर्जाबाबत मोठा निर्णय; ग्राहकांवर काय परिणाम होणार

टाइम्स मराठी । प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज लागते. यासोबतच बऱ्याचदा घर घेणे किंवा एखादे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी देखील अनेकजण कर्ज घेत असतात. बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या या कर्जाची त्याच्या व्याजदरानुसार परतफेड केली जाते. आज-काल ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यात येत असल्यामुळे पेमेंट एप्लीकेशन म्हणजेच Phonepe , Google pay , PayTM च्या माध्यमातून देखील लोन सर्विस दिले जातात. तुम्ही देखील PayTM च्या माध्यमातून पर्सनल लोन घेऊन इच्छित असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. कारण लोन घेऊ इच्छित असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. PayTM कंपनीने लोन घेण्याच्या काही नियमाने बदल केले आहे.

   

PayTM कंपनी Buy Now Pay Later (BNPL) सर्विसच्या माध्यमातून पर्सनल लोन देत आहे. मात्र आता या सर्विस मध्ये बदल करण्यात येणार आहे. या सर्विसच्या माध्यमातून  छोट्या मोठ्या प्रकारचे लोन दिले जातात. परंतु आता PayTM लहान रक्कम असलेले कर्ज देणार नाही. कंपनी सर्विसला मोठ्या लोन साठी केंद्रित करत आहे. जेणेकरून सर्विसच्या माध्यमातून मोठ्या किमतीत पर्सनल आणि मर्चंट लोन मिळेल. पेटीएम ने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो लोक प्रभावित होतील असा कंपनीचा अंदाज आहे.

 दैनंदिन गरजांसाठी कंपनीकडून मिळत होते छोटे लोन

PAYTM कंपनीने जेव्हा लोन सर्विस सुरू केली होती, तेव्हा छोट्या छोट्या गरजांसाठी कंपनी लोन देत होती. त्यानुसार कंपनी कडून दैनंदिन बिल भरणे, रिचार्ज यासारख्या छोट्या खर्चासाठी लोन दिले जात होते. कंपनीने सुरुवातीला ही सर्विस पेटीएम पोस्टपेड नावाने उपलब्ध केली होती. परंतु आता या सर्विसच्या माध्यमातून कंपनी छोटे लोन बंद करत आहे. कालांतराने कंपनी मोठ्या किंमतीच्या लोनकडे वळणार असल्याचं BT रिपोर्टनुसार उघड झाले आहे.

 50000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे कर्ज मिळणार नाही

आतापर्यंत  Paytm कंपनीने 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे 70 टक्के कर्ज उपलब्ध केले होते. परंतु आता कंपनी 50,000  रुपयांपेक्षा कमी किमतीचे लोन ग्राहकांना उपलब्ध करून देणार नाही. काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया RBI ने बँक आणि नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्यांना NBFCS धोकादायक व्यवहार टाळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे Paytm कंपनीने छोटे लोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.