ब्ल्यू व्हेल नव्हे तर ‘हा’ आहे जगातील सर्वात महाकाय प्राणी; डायनासोरही पडेल फिका

टाइम्स मराठी । जर तुम्हाला विचारलं की जगातील सर्वात मोठा आणि सर्वात जास्त काळ जिवंत राहणारा जीवाश्म कोणता? तर तुम्ही ब्ल्यू व्हेल च नाव घ्याल. कारण शास्त्रज्ञांनी शोध लावल्याप्रमाणे ब्ल्यू व्हेल हा जास्त काळापर्यंत जिवंत राहणारा जीवाश्म असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं. परंतु आता वैज्ञानिकांना ब्ल्यू व्हेल पेक्षाही जास्त काळ जिवंत राहणारा जीवाश्म शोधला आहे. त्याचं नाव आहे पेरुसेटस कोलोसस. पेरुसेटस कोलोसस नावाचा व्हेल प्राचीन असून शास्त्रज्ञांनी हा व्हेल शोधून काढला.

   

340 मेट्रिक टन वजन –

पेरू मध्ये 39 दशलक्ष वर्ष जुना व्हेल जीवाश्माचे अवशेष सापडले आहे. हा प्राचीन व्हेल ब्ल्यू व्हेल पेक्षाही जास्त वजनदार आहे. या प्राचीन व्हेलचे अवशेष पेरूच्या दक्षिण किनाऱ्याजवळ असलेल्या इका वाळवंटामध्ये सापडले.शास्त्रज्ञ आणि त्यांच्या टीमने शोधलेल्या या जीवाला त्यांनी पेरुसेटस कोलोसस असं नाव दिलं. त्याच्या शरीराची लांबी 20 मीटरहोते तसेच त्याचे वजन 340 मेट्रिक टन पर्यंत होते. म्हणजेच सर्वात मोठ्या ब्लू व्हेल पेक्षा दुप्पट आणि सर्वात मोठ्या डायनासोर अर्जेंटिनासोरसच्या वजनाच्या तिप्पट असा हा पेरुसेटस कोलोसस असेल. शास्त्रज्ञांना सापडलेल्या या सर्वात मोठ्या वेलच्या अवशेषांमध्ये 13 मणक्याचे हाड, चार बरगड्या, नितंबाचे हाड सापडले.

डायनासोरपेक्षाही मोठा जीव –

इटली येथील पिसा विश्वविद्यालयातील संशोधकांच्या नेतृत्वाखाली आणि रिसर्च टीमने या जीवाश्मा चा शोध लावला. यामध्ये मुख्य संशोधक जियोव्हानी बियाणू यांनी जीवाष्णू ची काही माहिती दिली. ६६ फूट उंची आणि ३४० मेट्रिक टन वजनाचा हा प्राणी आजच्या ब्लू व्हेल आणि अगदी सर्वात मोठ्या डायनासोरपेक्षाही जड होता. हेच कारण आहे की त्याच्या नावाचा शाब्दिक अर्थ ‘जायंट पेरूव्हियन व्हेल’ असा आहे. या व्हेलचे वजन हेच त्याचे खास वैशिष्ट्य आहे, जे असे सूचित करते की उत्क्रांती आपल्या कल्पनेच्या पलीकडची वैशिष्ट्ये असलेले जीव निर्माण करू शकते.