बोट उलटल्याने 30 जणांचा मृत्यू; जोरदार वाऱ्याचा बसला फटका

टाइम्स मराठी । फिलिपाईन्सची राजधानी म्हणून ओळख असलेल्या मनीला जवळील तलावामध्ये बोट उलटल्याची (Philippines Boat Capsize)घटना उघड झाली आहे. या बोटीतील 40 प्रवाशांची सुटका करण्यात आली असून 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे. फिलिपिन्स तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, जोरदार वाऱ्यामुळे मोटर बोट उलटली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागांमध्ये शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू असल्याचे वृत्त फिलिपाईन वृत्तसंस्थेने दिले.

   

यावेळी जोरदार वाऱ्यामुळे बोटिंग मधील लोक एका बाजूला जमा झाले. त्यामुळे बोट झुकली आणि तिचा आऊटरिगर तुटला आणि लगेच बोट उलटली असं पोलीस आणि तटरक्षकांनी सांगितलं आहे. या बोटीमध्ये चालक दलाचे सदस्य आणि 42 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी सुरक्षा नियमानुसार बऱ्याच प्रवाशांनी लाईफ वेस्ट घातले नव्हते. त्याचबरोबर हा फिलिपिन्स जवळील तलाव सेफ नसल्याचं सांगण्यात येतं. बऱ्याचदा बोटी गर्दीने भरलेल्या असतात आणि बऱ्याच जुन्या बोटी देखील या ठिकाणी वापरत आहेत. फिलिपिनचा सागरी सुरक्षेसाठी खराब रेकॉर्ड मानला जातो.

फिलिपिन्स हा 7600 पेक्षा जास्त बेटांचा द्वीपसमूह आहे. या आठवड्यामध्ये डोक्सुरीन चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. ज्यामुळे उत्तरेकडील आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या लूझोन बेटावर 175 किमी प्रति तास वेगाने वारे वाहत होते. आणि डोक्सुरीन या चक्रीवादळाने फिलिपाईन सोडल्यानंतरच काही बोटींना प्रवासासाठी परवानगी मिळाली होती. परंतु त्याचवेळी हा अपघात घडला.