Pitru Paksha 2023 | आपल्या सर्वांना माहितीच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पासूनच पितृ श्राद्ध हा कालावधी सुरू होतो. या कालावधीमध्ये पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी याकरिता प्रत्येक जण आपल्या पूर्वजांचे स्मरण करत असतो. त्यांच्या मृत्यूच्या तिथीनुसार त्यांच्या करिता गोडधोडाचे जेवण देखील करत असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या इतरांच्या बाबतीत फारशी माहिती नसते. अशावेळी चिंता करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या पितरांसाठी देखील श्राद्ध घालू शकता आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देऊ शकता, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…
या पंधरा दिवसांमध्ये पितरांची पूजा अर्चना केली जाते. श्राद्ध केले जाते यामुळे पितृदोषापासून तसेच पितृ ऋणा पासून आपली मुक्तता होते. अनेकदा कुटुंबातील सदस्य वारंवार आजारी पडत असतात. कुटुंबामध्ये एका मागे एक दुःख वेदना निर्माण करणारी परिस्थिती दिसून येते. या सगळ्या घटना जर आपले पितर, पूर्वज अशांत असतील तर यामुळे घडत असतात म्हणूनच अशावेळी पितृ श्राद्ध काळामध्ये जर आपण पितरांची सेवा केली तर या सर्व दोषातून आपली मुक्तता होते व आपले कुटुंब प्रगतीच्या दिशेने मार्ग करते.
सर्वपित्री अमावस्येला घाला पितृ श्राद्ध- Pitru Paksha 2023
जर आपल्या घरातील एखादा सदस्य किंवा एखादे पूर्वज एखाद्या विशिष्ट तिथीला मरण पावले असतील जसे की द्वितीया, षष्टी, सप्तमी, अष्टमी तर अशा तिथीला आपल्याला त्यांचे श्राद्ध घालणे गरजेचे आहे. अनेकदा काही वेळा आपल्याला मृत व्यक्तीची तिथी माहिती नसते किंवा काही वेळा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असेल किंवा एखादा व्यक्ती सैन्यामध्ये त्याला वीरमरण आले असेल तर त्या व्यक्तीची तिथी आपल्याला माहिती नसते अशावेळी देखील शास्त्राने त्या व्यक्तीचे श्राद्ध करण्याची तिथी सांगितलेली आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची ती मृत्यू तिथी माहिती नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीचे पितृ श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला घालू शकता.
सर्वपित्री अमावस्येला ज्या व्यक्तींचे मृत्यू चतुर्दशी, अमावस्येला झालेली आहे अशा सर्वांचे श्राद्ध या तिथीला प्रामुख्याने केले जाते. या सर्वपित्री अमावस्येला महाकाल तिथी देखील म्हटले जाते. या दिवशी सर्व पितरांच्या आत्म्याला शांती मिळते म्हणूनच जर तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबातील पूर्वजांची तिथी लक्षात नसेल तर अशावेळी देखील तुम्ही सर्वपित्री अमावस्याला आवश्यक करू शकता. जर एखाद्या तिथीनुसार तुम्हाला पूर्वजांचे श्राद्ध करता आले नाही किंवा काही अडचण असेल तर अशावेळी देखील तुम्ही सर्वपित्री अमावस्याला पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे श्राद्ध (Pitru Paksha 2023) करू शकता.