Pitru Paksha 2023 : पितृपक्षात या राशींचे नशीब चमकणार; 30 वर्षांनी आलाय दुर्मिळ राजयोग!

टाइम्स मराठी । पितृपक्ष कालावधी (Pitru Paksha 2023) सुरू झालेला आहे. या पितृपक्ष कालावधीमध्ये प्रत्येक जण आपल्या पितरांची शांती करून त्यांची आठवण करत आहे. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान देखील करत आहेत परंतु हा पितृ पक्षाला ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाचे देखील मानले गेलेले आहे. ज्योतिष शास्त्रातील बारा राशी आपल्या सर्वांना माहिती आहेत. ज्योतिष शास्त्रांमध्ये प्रामुख्याने ग्रह, तारे, नक्षत्र यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. या सर्व गोष्टींचा मानवी जीवनावर होणारा परिणाम या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला आहे. पितृपक्षामध्ये देखील काही राशींच्या व्यक्तींना येणारे दिवस महत्त्वाचे ठरणार आहे. या राशींच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून येणार आहे. या पितृपक्षात तीस वर्षांनी येणारा राजयोग देखील आलेला आहे, चला तर मग जाणून घेऊया बारा राशींपैकी नेमक्या कोणत्या अशा भाग्यवान राशी आहेत ज्यांना पितृपक्षात अनेक चांगल्या गोष्टी घडताना दिसून येणार आहेत त्याबद्दल..

   

30 वर्षांनी आलाय दुर्मिळ राजयोग- (Pitru Paksha 2023)

यंदा पितृ पक्ष कालावधीमध्ये (Pitru Paksha 2023) रिद्धी योग व अमृत योग घडून येताना दिसून येत आहे. हा योग राजयोग आहे. या योगामुळे काही राशींना त्याचा लाभ देखील मिळणार आहे. यातील पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या जातकांना येणाऱ्या काळ हा शुभ ठरणार आहेत. ज्या लोकांनी तुमचे पैसे उधारीने घेतलेले आहेत ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती आता सुधारणार आहेत. कुटुंबीय सोबत येणारा काळ हा चांगला व्यतीत करणार आहात.

यानंतर दुसरी राशी आहे मिथुन राशि. मिथुन राशीचे जातकांना येणारा काळ हा उत्तम ठरणार आहे. तुमच्या जीवनामध्ये अनेक अशा काही घटना घडणार आहेत त्यामुळे तुमची प्रगती होताना दिसून येणार आहे. नोकरीची संधी मिळेल तसेच तुमच्या प्रयत्नाला यश मिळणार आहे. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारून तुमच्या जीवनामध्ये शांतता निर्माण होणार आहे, त्यासोबतच आर्थिक स्थैर्यता निर्माण होईल.

त्यानंतरची तिसरी राशी आहे कर्क राशि. कर्क राशींना देखील येणारे दिवस आनंदाचे राहणार आहेत. तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. सहकारी वर्ग तुम्हाला कामांमध्ये मदत करणार आहे. वाहन व घर खरेदीचा विचार जर तुम्ही करत असाल तर येणारा काळ हा तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. येणाऱ्या दिवसात तुम्ही तुमची नवीन मालमत्ता खरेदी कराल. कन्या राशीच्या जातकाना येणार दिवसात आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणार आहेत. तुम्हाला जर नोकरी बदलायची असेल तर येणारा काळ हा तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही नोकरी हमखास बदलू शकता. तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळेल, अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रातील वरील या राशीच्या लोकांना येणारा काळ हा शुभ ठरणार आहे.