Pitru Paksha 2023 : ‘हे’ संकेत मिळाल्यास समजून जा, तुमचे पितर तुमच्यावर आहेत खुश!

टाइम्स मराठी । सध्या पितृपक्ष (Pitru Paksha 2023) चालू आहे. या पितृपक्षात पितरांची सेवा केली जाते. पितरांच्या आवडीचे पदार्थ पितरांना नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा काळ. या कालावधीमध्ये प्रत्येक जण आपल्या ऐपतीनुसार पूर्वजांचे स्मरण व श्राद्ध घालत असतो, परंतु जर तुम्हाला या कालावधीमध्ये काही गोष्टी पाहायला मिळाल्या व अनुभवायला मिळाल्या तर याचा अर्थ तुमचे पितर काहीतरी तुम्हाला सांगत आहे. यासाठी पितरांद्वारे काही संकेत देखील प्राप्त होत असतात. हे संकेत जर आपल्याला ओळखता आले तर आपले पुढील जीवन अगदी सुरळीतपणे व्यतीत होऊ शकते, म्हणूनच आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला असे काही शुभ संकेत सांगणारा आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पितराचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे असे दिसून येईल, चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत त्याबद्दल..

   

पितृपक्ष काळामध्ये (Pitru Paksha 2023) आपल्या पूर्वजांचे आत्मा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला दर्शन घडवितात असे हिंदू धर्म शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे. तसेच आपण एखाद्या व्यक्ती मृत झाल्यावर त्याच्या अस्थी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच पवित्र धर्मस्थळे नदी यांच्या किनारी विसर्जित करत असतो म्हणूनच गणेशपुरी, गंगा, काशी, गोदावरी यमुना यासारख्या स्थळांना हिंदू धर्मशास्त्रांमध्ये मान्यता देण्यात आलेले आहे. या कालावधीमध्ये जर आपण या ठिकाणी भेट दिली तर आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते,असे देखील सांगण्यात आलेले आहेत यासाठी अनेक विधी देखील केल्या जातात. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार विधी करू शकता किंवा या जागेवर फक्त भेट देऊन नमस्कार देखील करून येऊ शकता.

कोणकोणते आहेत संकेत – (Pitru Paksha 2023)

जर या पितृपक्ष कालावधीमध्ये (Pitru Paksha 2023) तुमच्या घराच्या आजूबाजूला अचानकपणे पिंपळाचे झाड उगवले तर हे शुभ संकेत मानले जाते. पिंपळाच्या झाडावर पितरांचा वास असतो, असे देखील म्हटले जाते. आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाला अध्यात्मिक दृष्टीने खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे.

या कालावधीमध्ये जर तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या दिसल्या तर हा देखील शुभ संकेत मानला जातो.

जर स्वप्नामध्ये तुम्हाला पूर्वज दिसले तर ते तुमच्या सोबत आहे असे म्हटले जाते. पितरांचा शुभ आशीर्वाद तुमच्या सोबत असल्याचे देखील मानले जाते.

पितृ श्राद्ध करत असताना जर तुम्हाला आजूबाजूला अत्तराचासुगंध आला तर हा देखील शुभ संकेत मानला जातो.

या दिवसांमध्ये तुमच्या घरात एखादा कावळा येऊन अन्न टिपून जाणे असा जर प्रकार घडला तर तुमचे पितर व पूर्वज तुमच्यावर खुश आहे असे म्हटले जाते.

जर निसर्गामध्ये विशिष्ट वातावरण निर्माण झाले आहे नैसर्गिक दृश्यामुळे वातावरण विहंगमय दिसू लागल्यास हे देखील शुभ संकेत मानले जाते.