टाइम्स मराठी । देशातील रुढी-परंपरांमध्ये महत्त्वाचा स्थान असलेला (पितृपक्ष Pitru Paksha 2024) किंवा पितृपंधरवडा १७ सप्टेंबरपासून सुरू होत असून २ ऑक्टोबरला संपणार आहे. पितृपक्ष १५ दिवस साजरा केला जातो. या काळात लोक आपल्या पूर्वजांना प्रसन्न करत असतात, त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचं ऋण व्यक्त करतात. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्ये केली जात नाहीत. पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये ते आज आपण जाणून घेऊयात.
कोणकोणत्या वस्तू दान करू नये? Pitru Paksha 2024
पितृ पक्षाच्या कालावधीत कधीही घरातील लोखंडी भांडी दान करू नका. त्याऐवजी स्टील किंवा चांदीची भांडी दान केल्यास ते अधिक चांगलं ठरेल. लोखंडी भांडी दान केल्याने तुम्हाला तुमच्या पितरांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो
पितृ पक्षाच्या काळात घरातील तेल कोणाला देऊ नका, असं केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता असते. खास करून मोहरीचे तेल तर चुकूनही दान करू नये
पितृपक्षात काय दान करावं-
पितृ पक्षात अन्नदान (Pitru Paksha 2024) करणे योग्य राहील. तुम्ही गहू आणि तांदूळ या जीवनावश्यक वस्तू दान करू शकता. तुमच्याकडे हे नसेल तर दुसरे कोणतेही पदरात तुम्ही दान करू शकता.
जर तुम्ही श्रीमंत असाल आणि पैशाची कसलीही कमी नसेल तर तुम्ही एखाद्या गरजूला किंवा गरिबाला जमीन दान करू शकता, किंवा संपत्ती दान करू शकता. असं केल्याने तुम्हाला मोठं पुण्य मिळते.
पितृ पक्षाच्या काळात गायीचे शुद्ध देशी तूप दान करणे देखील चांगले मानले जाते. गाईचे तूप भांड्यात ठेवून दान करणे शुभ मानले जाते. हे दान केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते असं म्हंटल जाते.