विमान अपघातात 5 बड्या राजकीय नेत्यांसह पायलटचा मृत्यू; हवेतच अचानक आग लागली अन….

टाइम्स मराठी । बुधवारी कोलंबिया येथील बोयाका विभागातील सैन लूइस डी गेसेना च्या नगरपालिका क्षेत्रामध्ये एक विमान अपघात घडला आहे. या घटनेमध्ये पायलट सह 4 राजकीय नेत्यांचा मृत्यू झाल्याचा उघड झालं आहे. हे चार राजकीय नेते पूर्व राष्ट्रपती अल्वारो उरीबेच्या उजव्या विचारसरणीच्या सेंट्रो डेमोक्रेटीकोचे सदस्य होते. हा अपघात घडला तेव्हा विमानाला अचानक आग लागल्यामुळे पायलटला लँडिंग करण्याचा चान्स मिळाला नाही.

   

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की या विमानात माजी सिनेटर नोहोरा तोवर, डिमास बैरेरो, एलियोडोरो अल्वारेज, विलाविसेन्सियो म्युनिसिपल कॉन्सिलर ऑस्कर रॉड्रिग्ज यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. विमाचा अपघात नेमका कसा झाला? यामागे काही घातपात तरी नाही ना? याबाबतची सखोल चौकशी करण्यात येणार असून लवकरच अधिकाऱ्यांकडे याबाबतचा रिपोर्ट दिला जाईल.

त्याचबरोबर स्थानिक मीडियानुसार विमानाने विलाविसेन्सियो या ठिकाणावरून बोगोटासाठी उडान केले होते. या विमानातील सर्वजण एका पार्टीच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी सैन लूइस डी गेसेना च्या नगरपालिका क्षेत्रामध्ये हा अपघात घडला. हवेत असतानाच लाग लागल्याने विमानाचा कंट्रोल गेला आणि आणि ते कोसळले. या दुर्दैवी अपघातानंतर वामपंथी राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी शोक व्यक्त केला आहे .