सोशल मीडियावर मोदींचा जलवा कायम!! Youtube वर 2 कोटी सब्सक्राइबर्स

टाइम्स मराठी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रसिद्धी बद्दल आम्ही काय सांगणार… संपूर्ण देशात मोदींचे भरपूर चाहते आहेत. मोदींना ओळखत नाही असा एकही माणूस देशात नसेल. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्याच मुखात मोदींचे नाव तुम्ही ऐकलं असेल. सोशल मीडियावर सुद्धा मोदींचे बरेच फॉलोअर्स आहेत. यापूर्वी ट्विटर वर मोदींनी सर्वाधिक फॉलोवर्स कमावले होते आणि आता प्रसिद्ध विडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या Youtube वर सुद्धा मोदींचे तब्बल २ कोटी सब्सक्राइबर्स आहेत.

   

नरेंद्र मोदींच्या Youtube Channel वर तुम्हाला त्यांची भाषणे, पक्षाचे कार्यक्रम, त्यांचा प्रवास याबाबत माहिती मिळते. केंद्र सरकारने राबवलेल्या योजना आणि ध्येयधोरणे याबाबत सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला मोदींच्या युट्युब चॅनेलवर मिळते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्ये आणि मोदींचे चाहते मोठ्या प्रमाणावर त्यांच्या चॅनेलला सब्सक्राइब करतात आणि सर्व माहिती मिळवतात. यूट्यूबवरील सब्सक्राइबर आणि व्ह्यूजच्या बाबतीत सुद्धा मोदींनी जगातील सर्व नेत्यांना मागे टाकलं आहे. मोदींच्या यूट्यूब चॅनलला एकूण 450 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. यातील ३ व्हिडिओ इतके प्रसिद्ध झाले कि एकूण 175 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांचा याबाबतीत दुसरा क्रमांक लागतो. जैर बोल्सोनारो यांच्या युट्युब चॅनेलवर 64 लाख सब्सक्राइबर आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की असून त्यांच्या युट्युब चॅनेल वर 11 लाख सब्सक्राइबर आहेत. परंतु जर तुलना केली तर मोदी या सर्व नेत्यांपेक्षा कोसोदूर पुढे आहेत. आणि दिवसेंदिवस त्यांची प्रसिद्धी जगात वाढतच चालली आहे.