POCO च्या या Mobile वर बंपर डिस्काउंट; 9000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

टाइम्स मराठी | भारतातील लोकप्रिय स्मार्टफोन ब्रांड पैकी एक असलेल्या POCO कंपनीने आता युजरसाठी शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार तुम्ही POCO C55 हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून 9000 रूपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. एवढेच नाही तर कंपनीने यासोबत एक्सचेंज ऑफर देखील दिलेली आहे. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

   

POCO C55 हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. यानुसार तुम्ही एक्सचेंज ऑफर्स लाभ घेऊन आणखीन कमी किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनवर 39% मंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. यानुसार तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 8499 रुपयांमध्ये मिळू शकतो. यासोबतच स्मार्टफोनवर बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहे. या ऑफर्सनुसार जर तुम्ही कोटक बँक क्रेडिट कार्ड आणि IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. यासोबतच एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन 7950 रुपयांपर्यंत मिळू शकतो. जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची कंडिशन चांगली असेल तर तुम्ही 7950 रुपयांपेक्षाही कमी किमतीत POCO चा हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

काय आहेत फीचर्स?

POCO C55 या स्मार्टफोनमध्ये 6.71 इंच चा 720 p आयपीएस एलसीडी+ hd डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेशोसह देतो. हा मोबाईल नेटफ्लिक्स यासारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून 480 P रिझोल्युशन वर HD कन्टेन्स स्टीम करतो. तसेच POCO च्या या मोबाईल मध्ये मीडियाटेक हेलियो G85 Soc प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर MIUI 13 वर बेस्ड आहे.

POCO C55 च्या कॅमेरा बद्दल सांगायच झाल्यास यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50 MP, चा आहे तर यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ साठीसमोरील बाजूला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे.

POCO C55 या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्ही हा मोबाईल कूल ब्ल्यू, पावर ब्लॅक, आणि फॉरेस्ट ग्रीन या कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू आहे. यात रियर माउंटेन फिंगरप्रिंट स्कॅनर यासारखे बरेच कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे.