Poco C65 : Poco ने लाँच केला बजेटमधील मोबाईल; किंमत 10000 रुपयांपेक्षाही कमी

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Poco चे भारतीय बाजारपेठेमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त मोबाईल उपलब्ध आहेत. Poco चे मोबाईल इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी पैशात मिळत असल्याने ग्राहकांची सुद्धा मोठी पसंती मिळत असते. आताही कंपनीने ग्राहकांसाठी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Poco C65 असून यापूर्वी या स्मार्टफोनचा टिझर लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने हा स्मार्टफोन 10000 रुपयांपेक्षाही कमी किमतीमध्ये लॉन्च केला असून दिवाळी निमित्त स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या युजर साठी हा नवीन लॉन्च झालेला मोबाईल अतिशय उत्तम ठरेल. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Poco C65 हा नवीन लॉन्च करण्यात आलेला मोबाईल कॉर्निंग गोरिला ग्लास प्रोटेक्शन सह उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 90 hz रिफ्रेश रेट सह 6.74 इंच HD + डिस्प्ले देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये mediaTek Helio G85 चीपसेट वापरण्यात आली असून हा स्मार्टफोन Android 13 बेस्ड MIUI 14 वर काम करतो.

कॅमेरा सेटअप– Poco C65

Poco C65 या स्मार्टफोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्यानुसार 50 MP प्रायमरी कॅमेरा, 2 MP मायक्रो लेंस आणि समोरील बाजूला 8 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या कंपनीने हा मोबाईल 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आणि 8 GB रॅम सह 256 GB इंटरनल स्टोरेज अशा २ व्हेरिएन्ट मध्ये हा मोबाईल लाँच केला आहे.

कलर ऑप्शन

Poco C65 या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ब्लॅक ब्ल्यू आणि पर्पल कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे. या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने हा स्मार्टफोन ग्लोबल लॉन्च केला आहे.  हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही व्हेरिएंटच्या किमती वेगवेगळ्या असून लवकरच हा स्मार्टफोन भारतात खरेदीसाठी अमेझॉन वर उपलब्ध करण्यात येईल.

किंमत

Poco C65 या स्मार्टफोनच्या  6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंट ची किंमत 109 डॉलर म्हणजेच भारतीय करेन्सी नुसार 9,060 रुपये एवढी आहे. त्याचबरोबर 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंट ची किंमत  129 डॉलर म्हणजेच दहा हजार 10,722 रुपये एवढी आहे.