टाइम्स मराठी । स्वस्तात मस्त मोबाईल साठी प्रसिद्ध असणाऱ्या POCO ने POCO F6 चे Deadpool Edition लाँच केलं आहे. या मोबाईल मध्ये 12GB रॅमसह 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा यांसारखी भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. कंपनीने आपल्या नव्या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये ठेवली असून येत्या ७ ऑगस्टपासून हा मोबाईल बाजारात विक्रीसाठी खुला असेल. आज आपण पोकोच्या या नव्या Deadpool Edition चे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात …..
6.7-इंचाचा डिस्प्ले-
POCO F6 Deadpool Edition मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह आणि 1.5K रिजोल्यूशनसह 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2400 Nits पीक ब्राईटनेस मिळतो. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचे प्रोटेक्शन मिळते. कंपनीने हा स्मार्टफोन अशा वेळी लॉन्च केला आहे जेव्हा डीलपूल आणि वूल्व्हरिन हे चित्रपट येत आहेत. या मोबाईल वर तुम्हाला मार्वल आणि फॉक्स युनिव्हर्स या दोन्ही पात्रांचे फोटो दिसतील. फ्लॅशवर तुम्हाला डेडपूलचा लोगो दिसेल. चार्जरवर डेडपूल स्टिकर देखील दिलेला आहे. कंपनीने मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर बसवला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Hyper OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.
कॅमेरा – POCO F6 Deadpool Edition
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, POCO F6 Deadpool Edition मध्ये पाठीमागील बाजूला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 20MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी पोकोच्या या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 90W चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
पोकोच्या या नव्या Deadpool Edition ची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या या मोबाइलचे 3 हजार युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. येत्या ७ ऑगस्टपासून इ कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.