POCO M6 5G : 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झालाय POCO चा 5G मोबाईल

POCO M6 5G । भारतात मोबाईल खरेदीचे प्रमाण जास्त आहे. अनेकजण सातत्याने नवनवीन मोबाईल विकत घेत असतात. सध्याचे जग हे 5G चे आहे. त्यामुळे सर्वच कंपन्या आपले मोबाईल 5G मध्ये आणत आहेत. तुम्ही सुद्धा नवा 5G मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असणाऱ्या स्मार्टफोनबाबत तुम्हाला सांगणार आहोत. POCO M6 5G असे या मोबाईलचे नाव असून त्याची किंमत 10 हजारांपेक्षा सुद्धा अगदी कमी आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

6.74 इंच डिस्प्ले –

POCO M6 5G मध्ये 6.74 इंच HD+ डिस्प्ले आहे. या डिस्प्ले मध्ये तुम्हाला 90 Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन मिळतंय. तसेच हा डिस्प्ले 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 600nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित MIUI 14 वर काम करतो..

कॅमेरा – POCO M6 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पोको M6 5G मध्ये 50 मेगापिक्सलचा AI ड्युअल कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी दिली असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या स्टोरेज बद्दल सांगायचं झाल्यास, POCO M6 5G हा स्मार्टफोन 4GB, 6GB किंवा 8GB रॅम आणि 128GB तसेच 256GB इनबिल्ट स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झालयास, POCO M6 5G च्या 4GB +128GB व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. तर 6GB +128GB व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आणि 8GB +256GB व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. हा मोबाईल निळ्या आणि काळ्या या २ रंगात तुम्हाला खरेदी करता येईल. 26 डिसेंबर 2023 पासून हा मोबाईल विक्री साठी उपलब्ध होईल.