POCO M6 PRO 5G  नव्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच; जाणून घ्या किंमत 

टाइम्स मराठी । Poco कंपनीने यावर्षी ऑगस्ट महिन्यात बजेट स्मार्टफोन M6 PRO 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने या मोबाईल नवीन स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केले आहे. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये 4 GB आणि 6 GB रॅम व्हेरिएंट उपलब्ध होते. आता कंपनीने  8GB रॅम +128 GB स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या मोबाईल मध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले असून हा स्मार्टफोन पॉवर ब्लॅक आणि फॉरेस्ट ग्रीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

   

स्पेसिफिकेशन

POCO M6 PRO 5G  या नवीन लॉन्च स्टोरेज व्हेरिएंट मध्ये 6.79 इंच FHD +LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  90  hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. आणि 91% स्क्रीन टू बॉडी सह 550 nits ब्राईटनेस देखील ऑफर करतो. हा मोबाईल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर वर चालतो. हा प्रोसेसर  4nm प्रोसेस नोडवर डेव्हलप करण्यात आले आहे. यामध्ये  2x 2.2 Ghz A78 आणि 6×2Ghz A55 Kryo CPU Core कॉन्फिंगरेशन मिळते. हा प्रोसेसर ऍड्रेनो 613  GPU सोबत सुसज्ज करण्यात आले आहे. 

 कॅमेरा

Poco M6 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50 MP, 2 MP  सेकंडरी कॅमेरा, आणि समोरील बाजूला फ्रंट कॅमेरा 8 MP मध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी मिळते.  ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोन मध्ये सिक्युरिटी साठी फिंगरप्रिंट स्कॅनर मिळत आहे . एवढेच नाही तर या स्मार्टफोनला डस्ट आणि स्प्लैश रजिस्टेंससाठी IP53 रेटिंग देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर चालतो. 

किंमत किती? POCO M6 PRO 5G

Poco M6 Pro 5G  या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर नवीन लॉन्च करण्यात आलेला स्टोरेज व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या नवीन व्हेरिएंटच्या खरेदीवर कंपनीकडून 2000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. तुम्ही हा स्टोरेज व्हेरीएंट फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकतात.

यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 एवढी आहे. तर 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरीएन्ट ची किंमत 10,999 एवढी आहे. आणि  6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरीएंट ची किंमत  12,999 रुपये आहे.