POCO X6 Series भारतात लाँच; मिळतात हे दमदार फीचर्स

POCO X6 Series । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी POCO ने POCO X6 सिरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने POCO X6 5G आणि POCO X6 Pro 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत हे दोन्ही मोबाईल लाँच करण्यात आले असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतात. चला तर मग आज आपण POCO X6 सिरीज बद्दल सर्वकाही जाणून घेऊयात.

   

POCO X6 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर, POCO X6 Pro फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा CrystalRes AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. POCO X6 5G मध्ये नवीन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्ट फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज कंपनीने दिले आहे. तर, POCO X6 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 8300-Ultra प्रोसेसर उपलब्ध असून या स्मार्ट फोनमध्ये 16GB LPDDR5x रॅम आणि 1TB UFS4.0 स्टोरेज मिळते.

कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, POCO X6 5G फोनमध्ये (POCO X6 Series) ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP सेकंडरी कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे POCO X6 Pro 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात देखील 64MP प्रायमरी कॅमेरा 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP चा मायक्रो कॅमेरा उपलब्ध आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. POCO X6 5G स्मार्ट फोनच्या बॅटरीची क्षमता 5,100mAh एवढी असून ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर POCO X6 Pro 5Gमध्ये 5,000mAh इतकी बॅटरी असून ती 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही मोबाईल मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा कंपनीतर्फे देण्यात आली आहे.

किंमत किती – POCO X6 Series

POCO X6 5G स्मार्ट फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 19,999 रुपये आहेत तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये एवढी आहे. याचे टॉप मॉडेल 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटसह येते, ज्याची किंमत 22,999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये ब्लॅक आणि व्हाइट कलरचे पर्याय कंपनीने दिले आहेत.

POCO X6 Pro 5G

POCO X6 Pro 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. तर, त्याच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये इतकी आहे. हा मोबाईल तुम्ही ब्लॅक, ग्रे आणि यलो कलर मध्ये खरेदी करू शकता.