Whatsapp Channel मध्ये मिळणार पोल फीचर्स; तुम्हांला मिळणार मत मांडण्याचा अधिकार

टाइम्स मराठी । Whatsapp चे संपूर्ण देशात लाखो करोडो युजर्स आहे. Whatsapp सुरुवातीला फक्त मेसेंजर होते. आता Whatsapp हे इन्स्टंट मेसेजिंग ॲप झाले आहे. या व्हाट्सअप मध्ये कंपनीने वेगवेगळे फीचर्स ऍड केले असून काही दिवसांपूर्वी चैनल फीचर्स सुविधा कंपनीने लॉन्च केली होती. आणखीन बरेच फीचर्स कंपनीकडून या व्हाट्सअप मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. सध्या Whatsapp मध्ये नवीन फिचर ऍड करण्याची तयारी सुरू आहे. या नवीन फिचरच्या माध्यमातून व्हाट्सअप चॅनलवर फॉलोवर्सचा  फीडबॅक घेणे शक्य होईल. क्रियेटर साठी हे फीचर अप्रतिम ठरणार आहे.

   

व्हाट्सअप वर लॉन्च करण्यात येणाऱ्या या नवीन फीचर बाबत माहिती WABETAINFO या वेबसाईटच्या लेटेस्ट रिपोर्ट च्या माध्यमातून उघड झाली. हे फीचर अँड्रॉइड युजर साठी उपलब्ध करण्यात येणार असून या फीचर्स स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला. हे नवीन पोल फीचर व्हाट्सअप ग्रुप आणि इंडिव्हिज्युअल चॅट साठी सुरुवातीपासूनच उपलब्ध आहे. परंतु आता हे फीचर चैनल साठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

काय आहे हे फीचर

पोल फीचर च्या माध्यमातून  व्हाट्सअप युजर्स वेगवेगळ्या प्रश्नांवर युजर्सचे मत आणि वोट घेऊ शकतात. या पोल फीचर मध्ये प्रश्न तयार करण्यासाठी आणि उत्तरांसाठी  A, B, C, D  या ऑप्शनसह क्रिएट करण्याची सुविधा देखील देण्यात येते. जेणेकरून या चारही ऑप्शन पैकी  कोणतेही ऑप्शन युजर्स निवडू शकतात. आणि या ऑप्शनच्या माध्यमातून त्यांचे मत नोंदवू शकतात. या फीचर्स चा वापर व्हाट्सअँप ग्रुप वर रियल टाईम आन्सर साठी करण्यात येतो.

व्हाट्सअप चॅनेल मध्ये क्रिएटर्स साठी उपलब्ध आहे हे फीचर्स 

whatsapp मध्ये उपलब्ध असलेल्या चैनल फीचर्स च्या माध्यमातून आपण इंस्टाग्राम प्रमाणे व्हाट्सअप वर देखील  आपल्या आवडत्या ॲक्टर एक्ट्रेस राजकीय नेत्यांना फॉलो करू शकतो. या चॅनल मध्ये क्रियेटर साठी बरेच फीचर्स ऍड करण्यात येत आहे.  क्रियेटर्स व्हाट्सअँप चॅनेल मध्ये फॉलोवर साठी गॅलरी मधून काही पिक्चर्स आणि व्हिडिओ सेंड करू शकतात. यासोबतच क्रियेटर्सला चॅनल मध्ये पेमेंट आणि कॅमेरा हे दोन ऑप्शन देखील मिळतात. आता क्रियेटर साठी पोल्स क्रिएट हे ऑप्शन देखील उपलब्ध होईल.