Porsche Macan EV : 613 KM रेंज देतेय ‘ही’ इलेक्ट्रिक SUV; किंमत किती पहा

Porsche Macan EV : गेल्या वर्षभरापासून भारतात इलेक्ट्रिक गाडयांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. पेट्रोल- डिझेलच्या खर्चापासून वाचण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. वाढती मागणी पाहून अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाजारात आणत आहेत. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Porsche ने आपली Macan EV ही इलेक्ट्रिक SUV लाँच केली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 613 किलोमीटर अंतर पार करते हे या गाडीचे खास असं वैशिष्ट्य आहे. आज आपण या कारचे खास फीचर्स आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

लुक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाल तर ही इलेक्ट्रिक SUV दिसायलाच अगदी रॉयल आहे. टायकनप्रमाणेच या कारची रचना केली आहे. ही इलेक्ट्रिक कार प्रीमियम प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक (PPE) आर्किटेक्चरवर तयार केली गेली आहे. कारला आयताकृती हेडलाइट्स आणि रॅपराउंड एलईडी रिअर लाईट देण्यात आले आहेत. कारच्या इंटेरिअर मध्ये 12.6-इंच कर्व्ह इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्टॅंडर्ड म्हणून 10.9-इंच इंफोटेनमेंट सिस्टमसह तीन स्क्रीन बसवण्यात आल्यात. Porsche च्या या इलेक्ट्रिक SUV मध्ये 540 लीटर बूट स्पेस मिळतो.

613 ​​किमी रेंज – Porsche Macan EV

Porsche Macan EV मध्ये 95 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. 270 kW DC चार्जरने चार्ज केल्यावर त्याची बॅटरी फक्त 21 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते. मात्र एकदा ही बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर तब्बल 613 ​​किलोमीटर अंतर आरामात पार करेन असा कंपनीचा दावा आहे. यावेळी कारचे टॉप स्पीड 220 किमी/तास इतकं राहील आणि अवघ्या 5.2 सेकंदात ही इलेक्ट्रिक SUV 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवण्यास सक्षम आहे.

किंमत किती?

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Porsche Macan EV ची सुरुवातीची किंमत १.६५ कोटी रूपये इतकी आहे. कंपनी या वर्षाच्या मध्यापर्यंत या कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे.