2024 मध्ये भारतात लॉन्च होणार Porsche Panamera; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । लक्झरी कार निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणारी Porsche ने नवीन सेडान कारचे अनावरण केले आहे. लवकरच ही सेडान भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. या लक्झरी कारमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणि पावरफुल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने ही कार 2024 मध्ये लॉन्च होणार असल्याची माहिती देत सेडान कारच्या किमतीचा खुलासा करण्यात आला आहे. या नवीन अपकमिंग सेडान कारचे नाव Porsche Panamera आहे.

   

फिचर्स

Porsche Panamera या लक्झरी कारमध्ये नवीन ट्यूर्बो ई हायब्रीड मॉडेल युनिक डिझाईन देण्यात आली आहे. यात मॅट्रिक्स LED हेडलाईट, 8 th ऍडजेस्टेबल इलेक्ट्रिक सीट्स, FHD 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, सेफ्टी साठी 6 एअरबॅग्स, पोर्श कम्युनिकेशन मॅनेजमेंट, व्हॉइस कंट्रोल आणि ऑडिओ इंटरफेस यासारखे बरेच फीचर्स मिळतील. याशिवाय लक्झरी कारमध्ये Taycan स्टाईल लाईटबार टेललाईट मिळेल.

पावरट्रेन

Porsche Panamera या लक्झरी कार मध्ये 4.0 लिटर ट्वीन टर्बोचार्ज्ड V8 इंजिन सुसज्ज करण्यात आले आहे. हे इंजिन 670 bhp पावर जनरेट करते. एवढेच नाही तर या इंजिन सोबत 188 bhp इलेक्ट्रिक मोटर देखील मिळते. ही इलेक्ट्रिक मोटर 187 bhp पावर जनरेट करते. या इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचा टोटल टॉर्क आउटपुट 930 nm एवढा मिळतो. यामध्ये अपडेटेड 8 स्पीड PDK ड्युअल कलथ ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही नवीन Panamera 3.2 सेकंदात प्रति घंटा 0 ते 100 किलोमीटर रेंज पकडते. या कारचे टॉप स्पीड 315 किलोमीटर प्रतितास इतकं आहे.

किंमत किती?

भारतात लॉन्च करण्यात येणारी ही अपकमिंग कार महागडी पोर्श सेडान असेल. या कारची एक्स शोरूम किंमत 1.68 करोड रुपये असेल. सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या V6  Panamera च्या तुलनेत ही कार महागडी असणार आहे. कारण या कारची किंमत 1.57 लाख रुपये आहे. या लक्झरी कार मध्ये  कंपनीकडून बरेच ॲडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहे. पूर्वीच्या मॉडेल पेक्षा ही कार सर्वात जास्त स्लिम दिसून येते. कंपनीने या लक्झरी कार मध्ये एक्स्टर्नली आणि पावरट्रेन मध्ये बरेच अपडेट्स उपलब्ध केले आहे.