पॅकबंद पाण्याच्या बॉटल विक्री संबंधित सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

टाइम्स मराठी । तुम्ही सुद्धा बाहेर पॅकबंद पाण्याच्या बॉटलमधून पाणी पीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. निकृष्ट मालाची आयात थांबवण्यासाठी आणि चांगल्या दर्जाच्या वस्तूच्या निर्मितीला चालना मिळण्यासाठी सरकारने नुकतेच काही गुणवत्ता मानक लागू केले आहेत. हे स्टॅन्डर्स पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स आणि फ्लेमलेस लाईटर साठी लागू करण्यात येणार आहे. याबाबत 5 जुलैला उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत (DPIIT) नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. यामुळे आता पाण्याची बॉटल आणि निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदी करता येणार नाही.

   

BIS 2006 या अधिनियमानुसार, Non BIS प्रमाणित उत्पादनांची निर्मिती, विक्री सध्या होऊ शकणार नाही. जेव्हा BIS चा टॅग लावण्यात येईल तेव्हाच पाण्याची बॉटल आणि फ्लेमलेस लाईटर या वस्तूंची विक्री करता येणार आहे. याची पडताळणी गुणवत्ता नियंत्रण यांच्या आदेशानुसार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर BIS 2006 या अधिनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 2 वर्षापर्यंत जेल आणि 2 लाख रुपये दंड भरावा लागेल. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा हे उल्लंघन झाल्यास त्यांच्या दंडात आणि शिक्षेमध्ये वाढ करण्यात येईल.

DPIIT म्हणाले की, गुणवत्ता नियंत्रण यांनी दिलेले हे आदेश सहा महिन्यानंतर लागू होणार आहेत. या आदेशानुसार पालन न केल्यास शिक्षा होणार आहे. त्याचबरोबर या नियमामुळे निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदी आणि विक्री होणार नाही. भारतातील गुणवत्तापूर्ण वातावरण बळकट करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य यासह ग्राहकांचे आरोग्य जपण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यापूर्वी देखील सरकारने 20 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या सिगरेट लाईटर ची आयात करण्यास बॅन केले होते.