AI ची भविष्यवाणी!! 25 वर्षानंतर मार्केटमध्ये दिसेल हॉवरकार 

टाइम्स मराठी । आजकाल टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली आहे. या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या जगात इमॅजिन केलेल्या गोष्टी सहजरीत्या इतरांकडून डेव्हलप करण्यात येऊ शकतात. तुम्ही उडणाऱ्या कार बद्दल विचार करत असाल परंतु काही काळानंतर तुम्हाला उडणारी कार मार्केटमध्ये लॉन्च झाल्याचे समजेल. जेव्हा पहिल्यांदा कारचे इन्वेंशन झाले असेल, तेव्हा लोकांना विश्वासही बसला नसेल. अशी परिस्थिती आपली 25 वर्षानंतर होऊ शकते. आपण सध्या विचार करत असलेली फ्लाईंग कार किंवा होवरकार 25 वर्षानंतर आपल्याला मार्केटमध्ये लॉन्च झालेली दिसू शकते. आपण आज या होवरकार बद्दल बोलत आहोत. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजंट ने 2073 मध्ये येणाऱ्या सुपरकार बद्दल भविष्यवाणी केली आहे.

   

आर्टिफिशियल इंटेलिजंटने केली भविष्यवाणी

आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या भविष्यवाणीनुसार, 2073 मध्ये येणारी सुपर कार ही अशा फीचर्स ने परिपूर्ण असेल, जे फीचर्स पाहून लोक हैरान होतील. आर्टिफिशियल इंटेलिजंटने भविष्यवाणी केलेल्या कार मध्ये आत्ताच्या कार मध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्स पेक्षाही वेगळे फीचर्स असतील. जे फीचर्स आज अशक्य आहेत. आज पासून 50 वर्षानंतर जगात होवरकार्स डेव्हलप करण्यात आलेल्या असतील. या गाड्या डोळ्याची पापणी मिटताच डोळ्यासमोरून गायब होतील. म्हणजेच या कार काही सेकंदातच हवेतून जाताना आपल्याला दिसतील.

50 वर्षानंतर मार्केटमध्ये असेल होवरकार

आर्टिफिशियल इंटेलिजंट ने केलेल्या भविष्यवाणी बद्दल मिडजर्नी यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, 50 वर्षांनंतर मार्केटमध्ये अशी कार उपलब्ध होईल याबद्दल आपण विचारही करू शकत नाही. या कारची डिझाईन अतिशय स्लिक असेल. यासोबतच या जेट इंजिन वापरण्यात येईल. आणि या कारला  जेट प्रमाणे चक्के लावल्याचेही दिसेल.

चीनमध्ये डेव्हलप होत आहे भविष्यातील कार

सध्या चीनमध्ये अशी कार डेव्हलप करण्यात येत असल्याचं उघड झालं आहे. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजंट नुसार, 2050 पर्यंत जगात प्रत्येक ठिकाणी होवरकार दिसतील. या होवरकार ने मार्केट पूर्णपणे गजबजलेले असेल. या होवर कार्स मध्ये ड्रायव्हरची गरज लागणार नाही. लोक या कारमध्ये बसल्यावर डायरेक्ट त्यांना  हव्या त्या ठिकाणी उतरू शकतील. ही होवरकार अत्यंत जलद स्पीड मध्ये असेल.