Promate XB19 स्मार्टवॉच लाँच; दमदार फीचर्स, किंमतही परवडणारी

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Promate ने नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. Promate XB19 असं या घडयाळाचे नाव असून कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये बरेच फीचर्स आणि सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे याची किंमत सुद्धा सर्वाना परवडेल अशीच आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केलं असून यामध्ये ब्लॅक ब्ल्यू आणि ग्रॅफाइड या रंगाचा समावेश आहे. Promate XB19 स्मार्टवॉचची किंमत 3499 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. तुम्ही देखील हे स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon वरून खरेदी करू शकता.

   

स्पेसिफिकेशन

Promate XB19 या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने रेक्टेंग्युलर डिस्प्ले उपलब्ध केला आहे. यामुळे स्मार्टवॉचला प्रीमियम लुक प्रदान होतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 1.9 इंचचा TFT HD एचडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 240×280 पिक्सल रिझोल्युशन प्रदान करतो. यासोबतच क्रिस्टल क्लियर विजीबिलिटी देखील सुनिश्चित करतो. या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने बॅटरी देखील उपलब्ध केली आहे. ही बॅटरी 15 दिवसांपर्यंत आरामात चालत.

गुगल असिस्ट

Promate XB19 या स्मार्टवॉच मध्ये सिरी आणि गुगल असिस्टंट या दोन्हींसाठी व्हॉइस असिस्टंट सपोर्ट उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने ब्लूटूथ हॅन्ड फ्री कॉलिंगचा देखील सपोर्ट उपलब्ध केला आहे. स्मार्टफोन सिंक केल्यानंतर हे स्मार्टवॉच युजर्स ला नोटिफिकेशन आणि कॉल मेसेजेस पर्यंत पोहोचण्याची अनुमती देते. महत्वाचे म्हणजे हे स्मार्टवॉच Android आणि ios दोन्हीमध्ये काम करते.

फिचर्स

या स्मार्टवॉच मध्ये 30 पेक्षा जास्त स्पोर्टस मोड उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत स्मार्टवॉच मध्ये हेल्थ आणि फिटनेस रिलेटेड बरेच फीचर्स उपलब्ध आहेत. त्यापैकी डायनामिक हार्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लिप ट्रेकिंग याचा देखील समावेश होतो. एवढेच नाही तर युजर्स या हेल्थ डेटा ला सोप्या पद्धतीने ट्रॅक करू शकतात. यासोबतच कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये 100 पेक्षा जास्त वॉचफेस उपलब्ध केले आहेत.

अँप

या स्मार्टवॉचला IP67 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट रेटिंग देण्यात आली आहे. या स्मार्ट वॉच मध्ये देण्यात आलेल्या हेल्थ डेटा ट्रॅक करण्यासाठी कंपनीने या स्मार्टवॉचचे ॲप देखील उपलब्ध केले आहे. या ॲपच्या माध्यमातून युजर फिटनेस टार्गेट प्रोग्रेस ट्रॅक करू शकतात. यासोबतच हा डेटा शेअर करण्याची अनुमती देखील हे ॲप देते. हे ॲप गूगल च्या प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोर वरून डाउनलोड करता येते.